महामागावरील खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:11 PM2019-09-23T23:11:37+5:302019-09-23T23:15:52+5:30

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ ची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाल्याने विशेषत: गुरुकृपा संकुलापासून चिंचखेड चौफुली परिसरात मोठ मोठे खड्डे झाले असून अनेक वाहनांचे या खड्यांमुळे नुकसान झाल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे चावे लागत आहे.

Drivers suffer due to highway rocks | महामागावरील खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास

महामागावरील खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास

Next
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : सुविधा नसल्या तरी टोल वसुली सुरूच ; नागरीकांत नाराजी

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावच्या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ ची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाल्याने विशेषत: गुरुकृपा संकुलापासून चिंचखेड चौफुली परिसरात मोठ मोठे खड्डे झाले असून अनेक वाहनांचे या खड्यांमुळे नुकसान झाल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे चावे लागत आहे.
या बाबत सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने वेळो वेळी प्रशासन कर्मचारी, अधिकाऱ्यांना तोंडी, लेखी निवेदनासह आंदोलन करून सुद्धा आजपर्यंत या परिसरातील महामार्गाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने याचा परिणाम म्हणून पाऊसामुळे या ठिकाणी असलेल्या मोठ मोठ्या खड्यात पाणी साचून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाले आहे. मात्र या परिसरात असलेल्या टोल प्लाझा कडून टोल वसुली केली जात आहे.
परिणामी जेष्ठ नागरिक, महिला व मुलांना या रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शिवाय या परिसरात सतत छोटे मोठे अपघात होत असतात तरी देखील प्रशासन गांभीर्य घेत नाही.
उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पूर्ण माहिती घेऊन पावसाळापूर्वी त्वरित सर्व्हिस रस्त्यांचे काम करूने गरजेचे होते. परंतु रस्ते प्राधिकरण अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे पावसाने हे रस्ते पूर्णपणे बंद होत असून वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे.

प्रतिक्रि या....
या परिसरात सतत छोटे मोठे अपघात होऊन शेतकºयांसह वाहनधारकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. महामार्ग प्रधारिकरण टोलच्या माध्यमातून जर कर वसुली करते तर मग त्या बदल्यात रस्ते का सुरिक्षत नाही लवकरात लवकर रस्ते दुरिस्थ करावी अन्यथा सामान्य माणसाने एकी केली तर तो काय करू शकतो हे सांगायला नको.
- हर्षल जाधव, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळगाव बसवंत.

चौकट....
शेतकºयांना या रस्त्याचा फटका
बाजार समितीत विक्र ीसाठी शेतकरी शेतमाल घेऊन याच रस्त्यावरून जातात परंतु महामार्गवर मोठ मोठे खड्डे असल्याने गाडीचेही व शेतीमालाचेही नुकसान होत असल्याने त्यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.


(फोटो २३ पिंपळगाव, २३ पिंपळगाव १, २३ हर्षल जाधव)
रस्ते प्रधारिकरनाच्या दुर्लक्षिपणामुळे चिंचखेड चौफुलीवर पडलेले मोठं मोठे खड्डे.
 

Web Title: Drivers suffer due to highway rocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.