श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 02:18 PM2020-09-16T14:18:56+5:302020-09-16T14:20:32+5:30

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.

Don't sacrifice Maratha reservation in credit | श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नका

सिन्नर येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसील राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना निवेदन देताना विठ्ठल उगले, हरिभाऊ तांबे, दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, विनायक सांगळे आदी.

Next
ठळक मुद्देसिन्नर: मराठा क्रांती मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी

सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे टिकाऊ स्वरूपात देण्यासाठी राज्य सरकारने प्रामाणिकपणे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार राहुल कोताडे व पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांना दिले.

गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले. सखोल संशोधनांती मराठा समाज हा मागास असल्याचे अहवाल दिला आहे. त्यानंतर सरकारने शिक्षण आणि नोकरीत मराठा तरूणांना आरक्षण दिले. तथापि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत राज्य सरकार व महाधिवक्ता न्यायालयात सक्षमपणे बाजु मांडण्यास कमी पडले ही बाब खचितच दुर्दैवी आहे. सर्वौच्च न्यायालयात तामिळनाडूचे आरक्षण टिकत आहे. त्याला कुठलेही स्थगिती दिली जात नाही. मग महाराष्ट्राबाबत व मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच असे का घडत आहे ? राजकारणाच्या कुरघोडीतुन जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षणापासुन दर ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत समाजातील गोरगरीब मुलांच्या भवितव्याचा विचार करून कायद्याच्या कसोटीवर टिकेल. अशी प्रभावी कायदेशीर यंत्रणा उभी करून मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी दत्ता वायचळे, नामदेव कोतवाल, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, हरीभाऊ तांबे, बाळासाहेब हांडे, आनंदा सालमुठे, विनायक सांगळे, शामसुंदर झळके, पांडुरंग वारुंगसे, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, प्रा. राजाराम मुंगसे, पंकज जाधव आदी उपस्थित होते.
 
Web Title: Don't sacrifice Maratha reservation in credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.