जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल बियाणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 01:27 AM2021-05-08T01:27:13+5:302021-05-08T01:27:49+5:30

यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. 

The district needs 73,000 quintals of seeds | जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल बियाणाची गरज

जिल्ह्याला ७३ हजार क्विंटल बियाणाची गरज

Next
ठळक मुद्देनियोजन : खासगी क्षेत्रावर अधिक भर

नाशिक : यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. 
यंदाही बियाणे पुरवठ्याबाबत खासगी क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी, ज्वारी, भात, मका, नागली, कापूस, सोयाबिन आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. मागील तीन वर्षांत सरासरी ६ लाख २३ हजार ७९ हेक्टर क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. तर तीन वर्षांत सरासरी ६३ हजार २३८ क्विंटल बियाण्याचा जिल्ह्याला पुरवठा झाला होता. सन २०२१ च्या खरीप हंगामात सोयाबिन वगळता ५ लाख ६५ हजार २७० हेक्टर क्षेत्र खरीप पिकांसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्याला ४८ हजार ९२४ क्विंटल मका तर १८  हजार ३६२ क्विंटल भाताच्या बियाण्याची गरज असून तशी मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. महाबीजकडून जिल्ह्याला ७८०१ तर राष्ट्रीय बीजनिर्मितीकडून ३०८५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गतवर्षीच्या  खरिपात ९७,१०२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. 
बांधावर होणार खत, 
बियाणे पुरवठा 
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बांधावर खत आणि बियाणे पुरविण्याची योजना याही वर्षी राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगितले जात आहे. गतवर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. २०२० च्या खरीप हंगामात १ लाख ४२ हजार ८९४ शेतकऱ्यांना ३१,०१७ क्विंटल बियाणे व ४५,९२८ मे. टन खत बांधावर पुरविण्यात आले होते.

Web Title: The district needs 73,000 quintals of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.