दिवसा शाळा, सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:37 AM2019-10-19T01:37:20+5:302019-10-19T01:39:50+5:30

मतदार स्लिपा वाटप करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या कालावधीत कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेने दिल्याने शाळांच्या परीक्षांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना शाळांमधील परीक्षा आटोपून निवडणुकीची कामे करावी लागत असल्याने सकाळी शाळा आणि सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप, अशी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.

Distribution of voter rolls by day school, evening | दिवसा शाळा, सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

दिवसा शाळा, सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप

Next
ठळक मुद्देकार्यमुक्ततेचे आदेश : परींक्षांमुळे बीएलओ अडचणीत

नाशिक : अवघ्या चार दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने निवडणूक कामांना वेग आला आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गतिमान झाल्याचा दावा जिल्हा निवडणूक शाखेकडून केला जात असला तरी मतदार स्लिपा वाटप करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या कालावधीत कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक शाखेने दिल्याने शाळांच्या परीक्षांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या शिक्षकांना शाळांमधील परीक्षा आटोपून निवडणुकीची कामे करावी लागत असल्याने सकाळी शाळा आणि सायंकाळी मतदार चिठ्ठ्यांचे वाटप, अशी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास २८ हजार कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामध्ये शिक्षकांचा देखील समावेश आहे. बीएलओ म्हणून जवळपास ८० टक्के शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आलेली आहे. या शिक्षकांना चार दिवसांत आपल्या मतदान केंद्रांचादेखील ताबा घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी सहामाही परीक्षा आटोपून त्यांना निवडणुकीच्या कामासाठी रुजू व्हायचे आहे; परंतु आता जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार स्लिपांचे वाटप केले जात असल्याने यासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश निवडणूक शाखेने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिलेले आहेत. बीएलओ असलेल्या शिक्षकांना सध्या परीक्षेचीदेखील जबाबदारी पार पाडावयाची आहेच, शिवाय शिक्षकांना कार्यमुक्त केले तर परीक्षेचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
बीएलओ म्हणून काम पाहणाºया शिक्षकांनी मतदार स्लिपा ताब्यात घेतलेल्या आहेत; मात्र वाटपाचे काम त्यांना शाळेच्या वेळेनंतर करावे लागत आहे. त्यामुळे सकाळी शाळा आणि सायंकाळी निवडणुकीचे काम अशी कसरत शिक्षकांना करावी लागत आहे. शहरातील शिक्षकांनी या स्लिपा ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळनंतर उशिरापर्यंत शिक्षकांना वाड्या-वस्त्यांवर फिरून मतदान स्लिपा वाटप करण्याचे काम करावे लागत आहे.

Web Title: Distribution of voter rolls by day school, evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.