जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:13 AM2019-08-03T01:13:32+5:302019-08-03T01:14:55+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघा दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येऊन जूनच्या अखेरच्या सप्ताहात गणवेशासाठी निधी वर्ग करण्यात आल्याने गेल्या महिना भरात नाशिक जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले

 Distribution of uniforms to 4% of Zilla Parishad students | जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप

Next
ठळक मुद्देशासनामुळे विलंब : १५ आॅगस्टपूर्वी प्रक्रिया करणार पूर्ण

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघा दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येऊन जूनच्या अखेरच्या सप्ताहात गणवेशासाठी निधी वर्ग करण्यात आल्याने गेल्या महिना भरात नाशिक जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळू शकले असून, उर्वरित २५ टक्के विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश वाटप करावेत, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीला बजावले आहेत.
अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेश मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेशचे पैसे वर्ग करून त्यांनीच ते खरेदी करावे, असा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून बराच वाद झाला. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शून्य रकमेवर बॅँकेत खाते उघडावे लागले. मात्र असे खाते उघडण्यास बॅँकांनीही नकार दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे वेळेत जमा होऊ शकले नाहीत. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेश न घेता पैसे खर्च करून टाकले, तर काही बॅँकांनी गणवेशाच्या जमा झालेल्या पैशातून बॅँकेचे शुल्क परस्पर वळते करून घेतल्याने शिक्षण विभागाला वर्षभर हा विषय पुरला. त्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात शासनाने आपलाच निर्णय फिरवून प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशापोटी सहाशे रुपये देण्याचा निर्णय घेऊन शाळा व्यवस्थापन समितीने शालेय पातळीवर गणवेशाची खरेदी करण्याच्या सूचना केल्या. शिक्षण विभागानेच या संदर्भातील निर्णय उशिरा घेतल्याने पुढे त्याच्या अंमलबजावणीत आपसूकच उशीर झाला.
२ लाख ३९ हजार विद्यार्थी
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन लाख ३९ हजार विद्यार्थी असून, या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे शाळा पातळीवर वर्ग करून गणवेश खरेदीसाठी दरपत्रके, कपड्यांचे मापे घेण्यासाठी विलंब लागल्याने जुलैअखेरपर्यंत एक लाख ६७ लाख ६५४ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपूर्वी शाळांनी गणवेश खरेदी करून घेऊन द्यावेत, असे आदेश प्रशासनाने सर्व शाळा व व्यवस्थापन समितीला दिले आहेत.

Web Title:  Distribution of uniforms to 4% of Zilla Parishad students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.