कोटमगावला मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:28 PM2020-03-28T18:28:28+5:302020-03-28T18:29:04+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला असून तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त रामचंद्र लहरे यांनी कोटमगाव येथे मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले .

 Distribution of masks, sanitizers to Kotamgaon | कोटमगावला मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कोटमगावला मास्क, सॅनिटायझरचे वाटप

Next

येवला : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला असून तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त रामचंद्र लहरे यांनी कोटमगाव येथे मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले . यावेळी विश्वस्त लहरे यांनी मार्गदर्शन करताना कोरोना या भयंकर रोगाचा नाश करण्यासाठी ग्रामस्थांनी शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच गरज नसल्यास विनाकारण घराबाहेर न पडता घरातच आपल्या कुटुंबातीयासमवेत वेळ घालवावा अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी उपस्थितांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी कोटमगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Distribution of masks, sanitizers to Kotamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.