सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे ‘महिलारत्न’ पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:30 AM2019-03-12T00:30:29+5:302019-03-12T00:31:01+5:30

सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

Distribution of 'Mahilaratna' award by Saajanya Mahila Vikas Sanstha | सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे ‘महिलारत्न’ पुरस्कारांचे वितरण

सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे ‘महिलारत्न’ पुरस्कारांचे वितरण

Next

नाशिक : सौजन्य महिला विकास संस्थेतर्फे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादकर सभागृहात सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे वितरण करण्यात आले  प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर दिग्दर्शक आनंद बच्छाव, अभिनेत्री नूतन मिश्री, डॉ. संतोष जाधव, शेफाली भुजबळ, पांडुरंग चव्हाण आदी उपस्थित होते.
महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन इफकोच्या संचालक साधना जाधव यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा मिठारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. संजय जाधव यांनी केले. गोपीनाथ लामखडे यांनी आभार मानले. याप्रसंगी पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कारार्थी महिला
महिला दिनाच्या निमित्ताने चेतना पवार, नीता घरत, कीर्ती कलाल, मंगला शिंदे, रुपाली निसाळ, संजीवनी मोकाशी, नीलिमा देशमुख, निशा गायकवाड, आशा भामरे, डॉ. ज्योती पाटील, सुवर्णा गांगोडे, मीना बिडगर, शोभा काळे, मीरा भोईर, संगीता गायकवाड, वैजयंती भट-सिन्नरकर, किरण जाधव, सुवर्णा कंक्राळे, उर्वशी बिरारी, अ‍ॅड. अनिता जगताप, ज्योती सूर्यवंशी, ज्योती गांगुर्डे, बिना पवार, नयना पाटील, योगीता आहेर, अस्मिता देशमाने, संगीता पाटील, सुनंदा सोनी, उषा खैरे यांचा सावित्रीबाई फुले महिलारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
माँ कर्मादेवी मंडळ
नाशिकरोड येथील माँ कर्मादेवी महिला मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा ज्योती गाडगीळ होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गिता नगरकर, मोनाली चौधरी, रेश्मा बारगजे, संगीता कोते, सरीता सोनवणे, मनिषा मोरे, वंदना वालझाडे, गायत्री शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रणिता यांचे स्त्री जीवनावरील व्याख्यान झाले. पाहुण्यांच्या हस्ते वैष्णवी व्यवहारे, अपूर्वा वाघचौरे ज्येष्ठ महिला बिरारी, कस्तुरे आजी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अश्विनी कोकाटे, वालझाडे, संयुक्ता कवडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Web Title: Distribution of 'Mahilaratna' award by Saajanya Mahila Vikas Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.