रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर कडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:32 PM2020-09-07T14:32:01+5:302020-09-07T14:35:26+5:30

सिन्नर:शिक्षकाबरोबरच आपले आई-वडील, भाऊ- बहीण पती किंवा पत्नी व मित्र परिवार हे सुद्धा आपल्या जीवनाला सुसंस्कृत दिशा व भरारी देतात. त्यामुळे त्यांचे आपल्या जीवनातील स्थान गुरु समानच असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे यांनी केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मातोश्री नर्मदा लॉन्सवर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

Distribution of Ideal Teacher Award from Rotary Club of Gondeshwar | रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वर कडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

सिन्नर येथे रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करतांना रोटरीचे पदाधिकारी. समवेत पुरस्कारार्थी शिक्षक.

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अगदी मोजक्या २० पाहुण्यांच्या उपस्थिती

सिन्नर:शिक्षकाबरोबरच आपले आई-वडील, भाऊ- बहीण पती किंवा पत्नी व मित्र परिवार हे सुद्धा आपल्या जीवनाला सुसंस्कृत दिशा व भरारी देतात. त्यामुळे त्यांचे आपल्या जीवनातील स्थान गुरु समानच असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे यांनी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब आॅफ गोंदेश्वरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण मातोश्री नर्मदा लॉन्सवर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अगदी मोजक्या २० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माध्यमिक विभागातून नारायण गडाख (न्यू इंग्लिश स्कुल, पंचाळे), संध्या गडाख (माध्यमिक विद्यालय, मुसळगाव ), प्राथमिक विभागातून बाळासाहेब सदगीर (प्राथमिक विद्यालय, पिंपळे), प्रशांत हेकरे (जि. प. शाळा, धुळवड), सुधाकर कोकाटे (एस. जी. पब्लिक स्कुल, सिन्नर) यांना गौरविण्यात आले.
आदर्श पिढी व नागरिक घडविण्यात शिक्षकांचा सिहांचा वाटा असतो असे माजी अध्यक्ष बाळासाहेब सदगीर यांनी प्रास्ताविकात सांगितले .
क्लबचे अध्यक्ष महेश बोऱ्हाडे यांनी रोटरीचे उद्दिष्ट्य सांगून आंतर राष्ट्रीय रोटरीच्या 'टिच' या टिचर सपोर्ट, ई लर्निंग, अ‍ॅडाल्ट लीटरसी, चाईल्ड डेव्हलपमेन्ट, हॅपी स्कुल या उपक्रमाबद्दल माहिती दिली. गुरुजनांनी आपल्याला घडविले आहे, त्यामुळे त्यांचा सर्वच आदर करतात, असे बोऱ्हाडे यांनी सांगितले .
सूत्रसंचलन माजी अध्यक्ष सुभाष परदेशी व सेक्रेटरी अनिल गोर्डे यांनी केले. सन्मानित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोमनाथ वाघ यांनी आदर्श शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले.

 

Web Title: Distribution of Ideal Teacher Award from Rotary Club of Gondeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.