शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:04 PM2020-03-30T18:04:33+5:302020-03-30T18:05:00+5:30

येथे कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे निमित्त साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण करण्यात आले.

 Distribution of gloves to Government employees | शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण

शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण

Next

इगतपुरी : येथे कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे निमित्त साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण करण्यात आले.
घाटनदेवी माता मंदिर व चेकपोस्टवर गस्तीसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी, तहसील कर्मचारी,तपासणी पथक,डॉक्टर यांना सुरक्षितता बाळगता येईल यासाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तहसिलदार अर्चना पागीरे यांच्या उपस्थितीत हातमोज्यांचे वितरण करण्यात आले. तसेच महावितरणच्या कर्मचा-यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, राजेश परदेशी,अजित बाफना, आकाश खारके,अजित बाफना, आकाश खारके आदी उपस्थित होते.

Web Title:  Distribution of gloves to Government employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.