नाशकात समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 07:04 PM2020-06-30T19:04:10+5:302020-06-30T19:06:44+5:30

नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सचे पालन करून शाळेने पालकांना पाठ्यपुस्तके सोपविली.

Distribution of free textbooks to students under holistic education in Nashik | नाशकात समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

नाशकात समग्र शिक्षाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

Next
ठळक मुद्देपाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप फिजिकल डिस्टन्सचे पालन करून वाटप शाळेने पालकांना सोपविली पाठ्यपुस्तके

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्गासाठी वार आणि वेळ याचे वेळापत्रक अगोदरच नियोजन करून पालकांना वर्गांच्या व्हाटस्अप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आले होते. दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या वेळेत फक्त एकच पालक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्याला न आणता स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून हॅन्ड सॅनेटायझर तसेच टेंपरेचर गणचा वापर करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्याध्यापक अशोकराव ठुबे, पर्यवेक्षक सुरेश सोमवंशी, पुरुषोत्तम थोरात, रघुनाथ आहेर, तसेच वर्गशिक्षक व त्यांना मदत करण्यासाठी इतर शिक्षक,ग्रंथपाल गंगाधर कोरडे उपस्थित होते.

Web Title: Distribution of free textbooks to students under holistic education in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.