दिव्यांग-मूकबधिर वसतिगृहाला मोफत औषधांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 05:27 PM2019-11-27T17:27:17+5:302019-11-27T17:28:37+5:30

सिन्नर : सोशल मीडियाचा वापर करून तालुक्यातील पंचाळे येथील चैतन्य युवाशक्ती फाउंडेशनने वैद्यकीय क्षेत्रातील मित्रपरिवाराला आवाहन केले. त्याद्वारे १० हजारांहून अधिक किमतीची औषधी जमा झाली. ही औषधे नाशिक येथील दिव्यांग मुला-मुलींच्या मूकबधिर वसतिगृहास भेट देण्यात आली.

 Distribution of free medicines to the deaf-mute deaf hostel | दिव्यांग-मूकबधिर वसतिगृहाला मोफत औषधांचे वाटप

दिव्यांग-मूकबधिर वसतिगृहाला मोफत औषधांचे वाटप

googlenewsNext

पंचाळे येथील चैतन्य युवाशक्ती फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सचिव महेश थोरात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. गरीब, अनाथ, दिव्यांग, मूकबधिर शाळा, वसतिगृहात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रथमोेपचार औषधे आणि शक्य होईल तेव्हा मोफत आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून थोरात यांनी केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात शिंगवेचे ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर मोगल, सिग्नस मेडिकल पाथर्डी फाटा, ओम फार्मा निड्स, मुंबई नाका, नाशिक या मेडिकल संस्थांनी दहा हजार रूपयांपेक्षा जास्त किमतीची प्रथमोचार औषधे उपलब्ध करून दिली. जमा झालेली औषधे नाशिकच्या नि:स्वार्थ मूकबधिर दिव्यांग मुला-मुलींचे वसतिगृहाचे संचालक गोकूळसिंग घोरपडे यांच्याकडे थोरात यांनी सुपूर्द केली.

Web Title:  Distribution of free medicines to the deaf-mute deaf hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.