जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 PM2020-01-13T18:00:03+5:302020-01-13T18:00:47+5:30

येवला : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा डी. पॉल इंग्लिश मीडियम स्कूल येथे दोन दिवस उत्साहात पार पडल्या.

Dist. W President's Cup cheer at Taluk level competition De Paul English Medium School | जि. प. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उत्साहात

येवला : तालुकास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धतील विजेत्यांना पारितोषिक देतांना शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, सभापती प्रवीण गायकवाड,

Next
ठळक मुद्देया स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्र मासाठी अध्यक्ष म्हणून सुरेखा दराडे उपस्थित होत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

येवला : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा डी. पॉल इंग्लिश मीडियम स्कूल येथे दोन दिवस उत्साहात पार पडल्या.
दुसऱ्या दिवशी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समितीच्या उपसभापती लक्ष्मीबाई गरुड यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, स्वारीपचे तालुका अध्यक्ष महेंद्र पगारे, भाऊसाहेब गरु ड उपस्थित होते. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत अनेक देखणे खेळ पहायला मिळाले. या स्पर्धेतील विजेत्याची निवड आता जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी झाली आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विविध गुणांचे कौतुक करावे तितके कमीच आहेत. या चिमुकल्यांचा कला-क्र ीडातील उत्साह वाखाणण्याजोगा आहे, असा विश्वास शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती सुरेखा दराडे यांनी केले.
गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी स्पर्धा आयोजन व विद्यार्थी शिक्षकांची भूमिका विशद केली. जि. प. शाळा नांदूरच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व इशस्तवन सादर केले.
गायकवाड यांनी कला, क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे महत्त्व सांगितले. या स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्र मासाठी अध्यक्ष म्हणून सुरेखा दराडे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बाळासाहेब लोखंडे, भगवान लोंढे, प्रवीण गायकवाड हे लाभले. तालुका क्र ीडा समन्वयक विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, सुनिल मारवाडी, वंदना चव्हाण उपस्थित होते.
परीक्षक म्हणून भाऊसाहेब वाघ, सविता बोरसे, श्रीमती भोये, शरद पाडवी, एस. आर. गायकवाड, आर. ए. गायकवाड, एस. एस. पुंड, टी. के. लहरे, भगवान तेलोरे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन नानासाहेब कुºहाडे, सुनील गोविंद, दिनेश मानकर यांनी तर बाजीराव सोनवणे यांनी आभार मानले.

असा आहे निकाल (सर्व प्रथम विजेते)...
वकृत्व स्पर्धा - लहान गट - विशाल पवार (मोठा मळा), मोठा गट ङ्क्त सोनाली आहेर (आडगाव चोथवा). चित्रकला स्पर्धा - लहान गट - सोहम फड (गवंडगाव), मोठा गट - आरती कुंदे (सोमठाणदेश). धावणे २०० मी. - पायल भागवत (गवंडगाव), ४०० मी.धावणे - मोहित दिवटे,१०० मी. धावणे - रेणुका माळी (पिंपळगाव), २०० मी धावणे - कुणाल जाधव (जऊळके). वैयक्तीक नृत्य - लहान गट - सुश्मिता वाहूळ, मोठा गट - वैष्णवी फुलारे (अंदरसूल मुली). समुह नृत्य - लहान गट - जि. प. शाळा पिंपळगाव लेप. मोठा गट - जि.प. शाळा आडगाव चोथवा. वैयक्तीक गायन - लहान गट - सिद्धेश दवंगे (बल्हेगाव), वैयक्तीक गायन - मोठा गट आम्रपाली पगारे (नांदुर), समुह गायन - लहान गट - (धामणगाव), मोठा गट - (पिंपळगाव लेप).
खोखो मुले- उंदिरवाडी, मुली - वाघाळे. कबड्डी मुले - अंगुलगाव, मुली - जयहिंदवाडी.

 


 

Web Title: Dist. W President's Cup cheer at Taluk level competition De Paul English Medium School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.