सेना नगरसेवकाला निधी दिल्याने भाजपांतर्गत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:32 AM2019-07-28T00:32:25+5:302019-07-28T00:33:13+5:30

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या नगरसेवकाला दिल्याने भाजपांतर्गत धुसफूस वाढली आहे.

 Dispute under BJP over funding to army councilor | सेना नगरसेवकाला निधी दिल्याने भाजपांतर्गत वाद

सेना नगरसेवकाला निधी दिल्याने भाजपांतर्गत वाद

Next

सिडको : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ मध्ये चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या नगरसेवकाला दिल्याने भाजपांतर्गत धुसफूस वाढली आहे. विशेष म्हणजे भाजपा आमदाराकडून निधी मिळूनही सेनेच्या नगरसेवकाने फलक लावून सारे श्रेय सेनेला घेतल्याने भाजपा नगरसेवक अलका आहिरे यांनी आपल्याच पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात प्रदेशाध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचे ठरविले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या आमदारांकडूनच शिवसेनेच्या नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी देत शिवसेना वाढविण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोपही आहिरे यांनी केल्याने भाजपात खळबळ उडाली आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ मधील आठवलेनगर परिसरात शनिवारी भाजपा आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून सुमारे ५० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून आठवलेनगर, रामकृष्णनगर भाग हा विकासकामांपासून दुर्लक्षित असल्याने याठिकाणी विकासकामे करावे यासाठी प्रभागाचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी मनपाकडे पाठपुरावा केला होता, यानंतर या कामाची निविदाप्रक्रियादेखील झाली असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामास स्थगिती दिली होती. यानंतर दातीर व आरोटे यांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे पाठपुरावर करून ५० लाख रुपयांचा निधी त्यांच्या आमदार निधीतून मंजूर करून घेतला.
प्रभागात विकासकामे करण्यासाठी भाजपा आमदार सीमा हिरे या भाजपाच्याच नगरसेवकांना निधी न देता शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी देत असल्याचा आरोप करून आहिरे यांनी याबाबत पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करणार असल्याचे सांगितले.
नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपाकडून आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक अलका आहिरे यांनीदेखील विधानसभा निवडणुकीची तयारी चालविल्याने सीमा हिरे यांनी सेनेला विकासकामांसाठी निधी देऊन अहिरे यांच्या प्रती असलेली आपली भावना प्रत्यक्ष व्यक्त केली, तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून निवडणुकीत सेना नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी हिरे यांनी निधी दिल्याचे बोलले जात आहे. सेनेनेदेखील आगामी निवडणूक लक्षात घेता, फलकबाजीतून भाजपाला श्रेय न देता स्वत:कडे घेतले आहे.
भाजपाच्या आमदार स्थानिक विकास निधीतून प्रभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रम सेनेच्या नगरसेवकांकडून केला जात असताना याच प्रभागाचे भाजपाचे नगरसेवक अलका आहिरे यांना मात्र सेनेच्या नगरसेवकांनी बोलविले नाही. शिवाय या कामांचे ठिकठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनरवर भाजपाच्या एकाही नेत्यांचा फोटो न लावता, सारे श्रेय सेनेकडे घेतले. या बाबीला भाजपा नगरसेवक अलका आहिरे यांनी हरकत घेतली असून, सेनेला दोष देतानाच आहिरे यांनी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यावरदेखील टीका केली आहे.

Web Title:  Dispute under BJP over funding to army councilor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.