स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 03:43 PM2020-10-21T15:43:49+5:302020-10-21T15:46:45+5:30

सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.

The disgusting type of filth in Sweet Mart on social media | स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार सोशल मीडियावर

स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार सोशल मीडियावर

Next
ठळक मुद्देनागरिकांनी कामगारांना चोप दिला. काही काळ दुकान बंद करण्यास भाग पाडले.

सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.
मनसेच्या पदाधिकार्‍यांसह स्थानिक नागरिकांनी सोमवारी (दि.19) संबंधित व्यावसायिकाला चोप देत स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे अन्यथा दुकान बंद करण्यास भाग पाडण्यात येईल, अशी तंबी दिली.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टचा कामगार खाली पडलेले पनीर शेवाळलेल्या बेसीनमध्ये स्वच्छ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ नेमका कुठला ? म्हणून अनेकांनी शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, शहराध्यक्ष निखिल लहामगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी सदर दुकान गाठले. तिथे पाहणी केली असता अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असा सगळा प्रकार तसाच दिसत होता.
किचन पाहणी केली असता तिथे देखील मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे स्थ्लृानिक नागरिकांनी कामगारांना चोप दिला. काही काळ दुकान बंद करण्यास भाग पाडले.

'खरे तर अन्न व औषध प्रशासनाने सर्व स्वीट मार्टची वेळोवेळी तपासणी करायला हवी. दर्शनी भाग चकाचक बनवायचा आणि मागच्या बाजूला अस्वच्छतेत पदार्थ्लृ बनवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळायचा असा हा प्रकार आहे. यात बदल न झाल्यास मनसे स्टाईल दणका देऊ.
विलास सांगळे
तालुकाध्यक्ष मनसे, सिन्नर
 

Web Title: The disgusting type of filth in Sweet Mart on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.