आयपीएलसाठी दिंडोेरीच्या खेळाडूची निवड
By admin | Published: July 8, 2014 12:51 AM2014-07-08T00:51:11+5:302014-07-08T00:52:52+5:30
आयपीएलसाठी दिंडोेरीच्या खेळाडूची निवड
नाशिक : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये कर्नाटककडून खेळणारा जलदगती गोलंदाज कुंजबिहारी रामकिसन जॉँगीड याची आयपीएल आॅक्शन खेळाडूंच्या यादीसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या आठ खेळाडूंमध्ये कुंजबिहारीसह अंकीत बावणे याचाही समावेश आहे. येत्या आॅक्टोबरपासून तो या स्पर्धेच्या सरावासाठी कानपूर येथे रवाना होणार आहे.
नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी येथील लामखेडे येथे फर्निचरचा व्यवसाय करणारे रामकिसन जॉँगिड यांचा कुंजबिहारी हा मुलगा असून, तो सध्या कर्नाटक संघाकडून खेळत आहे. गेल्या जुलैमध्ये दिल्ली प्रीमियर लीगमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर त्याची २०१५ आयपीएल निवड चाचणी खेळाडूंच्या यादीसाठी निवड झालेली आहे. यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यास त्याचा आॅक्शन प्लेयरच्या यादीत समावेश होऊ शकेल.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू राहुल द्रविड व निवड समितीचे अध्यक्ष सुरेश जोशी यांनी त्याची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी झारखंड, राजस्थान, गुजरात, दिल्ली व कर्नाटकमधील एकूण आठ खेळाडूंचा सहभाग आहे. येत्या २२ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कानपूर येथे पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर या खेळाडूंना कोचिंग करणार
आहे. कुंजबिहारी हा सध्या कृष्णा अकॅडमीत प्रशिक्षक शांताराम मेणे यांच्याकडे सराव करीत आहे. (प्रतिनिधी)