कृषिमंत्र्यांसह आयुक्तांचा कोरोनाबाधितांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:10 PM2020-05-11T21:10:55+5:302020-05-11T23:37:09+5:30

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विविध कोविड रुग्णालये तयार करण्यात आली असून, त्यातील फरान, जीवन व मन्सुरा या रुग्णालयात रविवारी (दि. १०) सायंकाळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी पीपीइ किट घालून जात प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला.

Dialogue of the Commissioner with the Minister of Agriculture | कृषिमंत्र्यांसह आयुक्तांचा कोरोनाबाधितांशी संवाद

कृषिमंत्र्यांसह आयुक्तांचा कोरोनाबाधितांशी संवाद

Next

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत विविध कोविड रुग्णालये तयार करण्यात आली असून, त्यातील फरान, जीवन व मन्सुरा या रुग्णालयात रविवारी (दि. १०) सायंकाळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी पीपीइ किट घालून जात प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी शहरातील फरान हॉस्पिटल येथे महापालिकेमार्फत कोविड रुग्णालयाचे एक युनिट तयार केले असून, प्रथम तिथे भुसे यांनी भेट दिली. कृषिमंत्री भुसे व आयुक्त कासार यांनी कोरोनाबाधित रुग्णांजवळ जाऊन, त्यांच्याशी संवाद साधला आणि विचारपूस केली. रुग्णांना मिळत असलेल्या सोयीसुविधा व उपचार याची खात्री करतानाच रुग्णांना धीर दिला.
कोविड रुग्णालयांमध्ये कोरोना-बाधित रुग्ण असल्याने इतर लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे आजारपणाच्या काळात रुग्णांना आपल्या स्वकियांनी भेट दिल्यास एक मानसिक धीर व स्वास्थ प्राप्त होते, सुरक्षेच्या कारणास्तव कोविड हॉस्पिटलमध्ये इतर लोक जाण्यास घाबरतात किंवा त्यांना प्रतिबंध केलेला असतो. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये वेगळी भावना उत्पन्न होऊ नये यासाठी भुसे व आयुक्त कासार यांनी स्वकीयांच्या भावनेतून सर्व कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारणा केली.

Web Title: Dialogue of the Commissioner with the Minister of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक