देवमामलेदार यात्रोत्सवासाठी कृती आराखडा तयार करणार : दिलीप बोरसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 05:33 PM2019-12-11T17:33:11+5:302019-12-11T17:34:21+5:30

सटाणा : बागलाणचे आराध्यदैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे सदैव स्मरण व्हावे व त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा यासाठी समाजधुरिणांनी महाराजांचा यात्रोत्सव सुरू केला आहे. संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी आगामी काळात ट्रस्ट व नगरपालिका यांच्या सहकार्याने तसेच आवश्यक त्या ठिकाणी प्रायोजक शोधून ही यात्रा एक महोत्सव म्हणून कसा साजरा करता येईल यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल, असे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले.

Devmamledar will prepare action plan for the festival: Dilip Borsay | देवमामलेदार यात्रोत्सवासाठी कृती आराखडा तयार करणार : दिलीप बोरसे 

देवमामलेदार यात्रोत्सवासाठी कृती आराखडा तयार करणार : दिलीप बोरसे 

Next

२२ डिसेंबरपासून शहरात श्री यशवंतराव महाराज यांच्या यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज येथील सभागृहात आमदार बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खातेप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी ते बोलत होते. हा यात्रोत्सव साजरा करतांना व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून आमदार बोरसे पुढे म्हणाले की, हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची आर्थिक कुचंबणा कशी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या कुस्ती दंगलीचे देखील स्वरूप यापुढे बदलण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यात्रोत्सव काळात पोलिस बंदोबस्तात वाढ करून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस तैनात करावेत तसेच भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही बोरसे यांनी दिल्या.
नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी संपूर्ण शहरात ठिकठिकाणी अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची घोषणा केली. याचा नियंत्रण कक्ष पोलीस ठाण्यात राहणार आहे. यामुळे सटाणा एक सुरक्षित शहर म्हणून नावारूपाला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराजांच्या स्मारकाच्या कामालाही लवकरच सुरु वात करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष मोरे म्हणाले. ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. विश्वस्थ रमेश देवरे, रमेश सोनवणे, राजेंद्र भांगडिया, प्रवीण पाठक, सुनील खैरनार, धर्मा सोनवणे, उपनगराध्यक्ष मुन्ना शेख, नगरसेवक दिनकर सोनवणे, राहुल पाटील, मनोहर देवरे, पुष्पा सूर्यवंशी, निर्मला भदाणे, डॉ. विद्या सोनवणे, नाना मोरकर, मनोज वाघ, दत्तू बैताडे, देवीदास भावसार, नगरसेवक मुन्ना शेख, मनोहर देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, डॉ. शशिकांत कापडणीस तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे विश्वस्त तसेच नागरिक उपस्थित होते.

Web Title: Devmamledar will prepare action plan for the festival: Dilip Borsay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.