क्रूर अत्याचाराच्या गुन्ह्यात संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:58 PM2020-01-22T23:58:36+5:302020-01-23T00:29:07+5:30

दरी-मातोरी येथील फार्महाउसवर दोघा डीजेचालकांना अमानुष मारहाण, शिवीगाळ करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ११ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि.२२) संपल्याने त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

Detention of suspects in cruel torture case | क्रूर अत्याचाराच्या गुन्ह्यात संशयितांना कोठडी

क्रूर अत्याचाराच्या गुन्ह्यात संशयितांना कोठडी

Next
ठळक मुद्देधुळ्यातील गुंडाच्या घराची झडती : पिस्तूलसह शॉक देणारे उपकरण जप्त

नाशिक : दरी-मातोरी येथील फार्महाउसवर दोघा डीजेचालकांना अमानुष मारहाण, शिवीगाळ करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ११ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि.२२) संपल्याने त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पंचवटीतील सराईत गुन्हेगार संदेश काजळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी पार्टी रंगविली होती. या पार्टीत रात्रभर धिंगाणा घालताना डीजे आॅपरेटर दोघा तरुणांना साउंडचा दर्जा चांगला नसल्याचे सांगत कुरापत काढून बेदम मारहाण केली होती. तसेच विवस्त्र करून उघड्या शरीरावर कमरेच्या पट्ट्याने बेदम करीत गंभीर जखमी केले होते.
या गुंडांनी त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्यदेखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामीण पोलिसांनी आठवडाभरात फरार संशयित म्होरक्या काजळेसह त्याच्या अन्य दहा साथीदारांच्या मुसक्या बांधल्या.
त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अनैसर्गिक अत्याचार, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
या गुन्ह्यात फरार झालेल्या काजळेसोबत नवापूरमधून भूषण राजेंद्र सुर्वे (३०, रा. धुळे) यास अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सुर्वेच्या घराची झाडाझडती घेतली असता गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल पोलिसांना मिळून आले. गुन्हा घडला त्या फार्महाउसमधून दोघा तरुणांना ज्या विद्युत उपकरणाने शॉक दिला ते उपकरणही पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Detention of suspects in cruel torture case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.