रस्ता दुरुस्तीसाठी केली जमा लोकवर्गणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:50 PM2020-09-09T17:50:37+5:302020-09-09T17:55:11+5:30

मालेगाव : येथील फार्मसीनगर भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करुन महापालिकेचा निषेध केला.

Deposits made for road repairs | रस्ता दुरुस्तीसाठी केली जमा लोकवर्गणी

फार्मसी नगरमधील रस्ता दुरुस्तीसाठी लोकवर्गणी जमा करताना रिजवान बॅटरीवाला, उबैद आसीफ, इम्रान इस्माईल, इब्राहीम आरीफ अयाज आदि.

Next
ठळक मुद्देरस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही महापालिका दखल घेत नाही.

मालेगाव : येथील फार्मसीनगर भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करुन महापालिकेचा निषेध केला.
शहरातील बहुतांशी रस्त्यांची दूरावस्था झाली आहे. मोहंमद अली रोड ते फार्मसी दरम्यानचा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करूनही महापालिका दखल घेत नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला खाट टाकून वर्गणी जमा केली. या वर्गणीतून काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आला. महापालिका मुलभूत सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे. आंदोलनात रिजवान बॅटरीवाला, उबैद आसीफ, इम्रान इस्माईल, इब्राहीम आरीफ अयाज आदि सहभागी झाले होते.
 

Web Title: Deposits made for road repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.