घोटीच्या गजानन मंडळाच्या साई पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 12:37 AM2022-01-18T00:37:04+5:302022-01-18T00:39:38+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्रमंडळ आयोजित घोटी ते श्री क्षेत्र शिर्डी दरम्यान साई पदयात्रा पालखी सोहळ्याचे ...

Departure of Sai Palkhi of Gajanan Mandal of Ghoti | घोटीच्या गजानन मंडळाच्या साई पालखीचे प्रस्थान

घोटीच्या गजानन मंडळाच्या साई पालखीचे प्रस्थान

Next
ठळक मुद्देशेकडो भाविक शिर्डीकरिता प्रस्थान : कोरोनाच्या नियमांचे पालन

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्रमंडळ आयोजित घोटी ते श्री क्षेत्र शिर्डी दरम्यान साई पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ही पालखी मानाची समजली जात असून, गजानन मित्रमंडळाचे पालखी सोहळ्याचे हे २०वे वर्ष आहे. शेकडो भाविक याप्रसंगी पदयात्रेत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात साईंच्या गजरात पालखीचे सोमवारी (दि.१७) प्रस्थान झाले.

प्रस्थानपूर्वी पालखी पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालखी पूजनाचे मानकरी सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे संचालक निखिल गोठी यांनी सपत्नीक पूजन केले. चार दिवस चालणाऱ्या या पदयात्रा पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला असून, त्यांच्या निवासाची, भोजन व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वरदादा लहाने, पंचायत समिती उपसभापती विठ्ठल लंगडे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, भगीरथ मराडे, प्रशांत कडू, दशरथ भागडे, अनिल भोपे, सुनील जाधव, माजी ग्रामपालिका उपसरपंच रामदास शेलार, शरद हांडे यांचेसह पालखी सोहळ्याचे आयोजक गजानन मित्र मंडळाचे पदाधिकारी ग्रामपालिका सदस्य स्वाती कडू, हिरामण कडू, रामदास शेलार, सुरेश कडू, भाऊसाहेब शेलार, आदींनी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान केला. याप्रसंगी ग्रामपालिका सदस्य व तालुक्यातील भाविक उपस्थित होते.
इन्फो

यंदा कलाकारांची अनुपस्थिती
इगतपुरी तालुक्यातील नागरिकांचे या पालखी सोहळ्याकडे लक्ष लागून असते. दरवर्षी चित्रपटसृष्टीतील कलाकार या पालखीला आवर्जून हजेरी लावत असतात. मराठी चित्रपट सृष्टीतील निशिगंधा वाड, अलका कुबल यांसह असंख्य सिनेतारकांनी यापूर्वी हजेरी लावली आहे. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे पाहुण्यांची उपस्थिती नव्हती.


गजानन मित्रमंडळ आयोजित पालखी सोहळ्याच्या प्रसंगी शिवराम झोले, निवृत्ती जाधव, गोरख बोडके, ज्ञानेश्वरदादा लहाने, विठ्ठल लंगडे, रामदास भोर, भगीरथ मराडे, प्रशांत कडू, दशरथ भागडे, अनिल भोपे, सुनील जाधव, रामदास शेलार, हिरामण कडू, सुरेश कडू, शरद हांडे, हरीश चव्हाण आदी.

 

 

Web Title: Departure of Sai Palkhi of Gajanan Mandal of Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.