Demand of two thousand megawatt scarcity due to demand increase | मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॅटचा तुटवडा
मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॅटचा तुटवडा

ठळक मुद्देपुर्णक्षमतेने विजनिर्मिती: निर्मिती १६ हजार तर मागणी १८हजार मेगावॅट


लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे: उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत आहे. सद्या महानिर्मितीच्या थर्मल, गॅस, हायड्रो, सोलर व इतर स्त्रोतांच्या माध्यमातून १६,४१९ मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. मात्र मागणी १८,४५८ मेगावॉट असल्याने सध्या दोन हजार मॅगावॅटची तूट भरून काढावी लागत आहे. दरम्यान, प्रॉडक्शन कॉस्ट जास्त असल्याने सद्या परळीचे सर्व संच बंद ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील सर्वज वीजनिर्मिती संचातून जास्तीतजास्त वीजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. कोराडीचे २१० मेगावॉटचे २ व ६६० मेगावॉटचे ३ अशा पाच संचांची निर्मिती क्षमता २४०० मेगावॉट असून १४०१ मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे. नाशिकच्या २१० मेगावॉटच्या तीनही संचातून ४४८ मेगावॉट वीज निर्मिती सुरू आहे. वास्तविक या केंद्राची क्षमता ६३० मेगावॅट इतकी आहे. भुसावळ येथे २१० चा एक व ५०० चे दोन संच मिळून तेथील उत्पादन क्षमता १२१० मेगावॉट आहे. सद्या २१० चा संच बंद आहे; तर ६३० च्या दोन संचांमधून ४४८ मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे.
पारसला २५० च्या दोन संचांची क्षमता ५०० आहे. तेथे ४५९ मेगावॉट वीज निर्मिती सुरु आहे. परळी येथे २१० चे दोन व २५० चे तीन संच मिळून ११७० निर्मिती क्षमता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तेथील सर्व संच बंद ठेवण्यात आले आहेत.अशीही तेथे पाण्याची समस्या भेडसावते आहे. मात्र वीज निर्मिती खर्च जास्त होत असल्याने तेथील संच देखील बंद ठेवल्याचे सांगितले जाते.
खापरखेडा येथे २१० चे चार व ५०० चा एक अशा पाच युनिटसची क्षमता १३४० मेगावॉट आहे. तेथील सर्व युनिटस कमी अधीक प्रमाणात सुरु असून सद्यस्थितीत ८९८ मेगावॉट वीज निर्मिती करीत आहेत.चंद्रपूर येथे २१० चे दोन व ५०० चे पाच अशा सात संचांंची निर्मिती क्षमता २९२० मेगावॉट आहे.तेथील सर्व संच पूर्ण क्षमतेने सुरु असून सद्या २४७० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे.


Web Title: Demand of two thousand megawatt scarcity due to demand increase
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.