‘आश्रमशाळेत क्र ांतिकारकांच्या प्रतिमा लावण्याची मागणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:42 PM2020-02-02T22:42:45+5:302020-02-03T00:24:25+5:30

पिंपळगाव बसवंत : आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत लावण्यात याव्यात व आदिवासी विकासामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांना आदिवासी क्रांतिकारकांची ...

'Demand for revolutionary images in Ashram school' | ‘आश्रमशाळेत क्र ांतिकारकांच्या प्रतिमा लावण्याची मागणी’

के. सी. पाडवी यांना निवेदन देताना अर्जुन गांगुर्डे, प्रभाकर फसाळे, संदीप गांगुर्डे, शारदा प्रतिके, बापू जाधव आदी.

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत : आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा प्रत्येक आदिवासी आश्रमशाळेत लावण्यात याव्यात व आदिवासी विकासामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांना आदिवासी क्रांतिकारकांची नावे देण्याची मागणी आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खरा इतिहास आणि आदिवासी क्रांतिकारकांचे बलिदान समजावे. यामुळे समाजबांधवांच्या मनात आदिवासी क्र ांतिकारकांबद्दल अस्मिता निर्माण होईल तसेच समाज जागृतीसाठी प्रेरणादायी ठरेल. तसेच आदिवासी विकासमार्फत ज्या योजना आदिवासी बांधवांच्या विकासासाठी दिल्या जातात, त्या योजनांना आदिवासी क्रांतिकारक व थोर पुरुषांची नावे देऊन आदिवासी क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण करून द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रभाकर फसाळे, जिल्हाध्यक्ष संदीप गांगुर्डे, महिला जिल्हाध्यक्ष शारदा प्रतिके, नाशिक शहराध्यक्ष बापू जाधव, मीरा भोईर, किरण पीठे, विकी गायकवाड, वसंत वाघचौरे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Demand for revolutionary images in Ashram school'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.