येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 06:06 PM2020-09-17T18:06:57+5:302020-09-17T18:07:15+5:30

येवला : शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाने तातडीने सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांसह संबंधितांकडे केली आहे. शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे.

Demand for repair of Yeola-Nandgaon road | येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

येवला-नांदगाव रस्ता दुरूस्तीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देखड्ड्यांमध्ये पावसाचे व सांडपाणी तुंबल्याने वाहनधारक व पादचार्यांची मोठी गैरसोय

येवला : शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाने तातडीने सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांसह संबंधितांकडे केली आहे. शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे.

या खड्ड्यांमध्ये पावसाचे व सांडपाणी तुंबल्याने वाहनधारक व पादचार्यांची मोठी गैरसोय होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. येत्या आठ दिवसांत सदर रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष शेरू मोमीन, सोमनाथ रोकडे, समीर सय्यद, सिद्धीक अन्सारी, मच्छिंद्र रोकडे, अविनाश गोसावी, आदम मोमीन, हुसेन अन्सारी, अरबाज कुरेशी, धर्मराज अलगट, सुनील मुरकुटे, गणेश देवरे, गुलाब कमोदकर, अंबादास कटके आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

Web Title: Demand for repair of Yeola-Nandgaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.