नांदगाव रेल्वे फाटकावर पादचारी पुलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:36 PM2021-02-23T22:36:41+5:302021-02-24T00:51:33+5:30

नांदगाव : येथील बंद करण्यात आलेल्या रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून सब-वे सुरू करण्यात आला असला तरी बंद फाटकावर पादचारी पुलाची आवश्यकता असल्याने खासदार डॉ. भारती पवार यांनी पादचारी पुलासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा, अशी मागणी क्रांतिवीर लहुजी टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली.

Demand for pedestrian bridge at Nandgaon railway crossing | नांदगाव रेल्वे फाटकावर पादचारी पुलाची मागणी

विविध मागण्यांचे निवेदन खासदार डॉ. भारती पवार याना देताना लहुजी टायगर सेनेचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देनिवेदन : लहुजी टायगर सेनेचे खासदारांना साकडे

नांदगाव : येथील बंद करण्यात आलेल्या रेल्वे फाटकाला पर्याय म्हणून सब-वे सुरू करण्यात आला असला तरी बंद फाटकावर पादचारी पुलाची आवश्यकता असल्याने खासदार डॉ. भारती पवार यांनी पादचारी पुलासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा, अशी मागणी क्रांतिवीर लहुजी टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली.
फाटकाबाहेर मातंग समाजाची मोठी वसाहत असून या वसाहतीत खासदार निधीतून समाजमंदिर बांधून द्यावे, अशी मागणी क्रांतिवीर लहुजी टायगर सेनेच्या शिष्टमंडळाने खासदार पवार यांच्याकडे केली.

क्रांतिवीर लहुजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक व राज्यव्यापी संघटनेच्या वतीने शरद त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुक्यातील मातंग समाजाच्या मागण्यांसाठी समाजातील शिष्टमंडळाने खासदार पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली. या वेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद त्रिभुवन, प्रदेशाध्यक्ष विजय काकडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष विलास थोरात, नांदगाव तालुका अध्यक्ष किरण भालेकर, उपाध्यक्ष दत्तू थोरात, सचिव पोपट थोरात, निलेश वैराळ, ज्ञानेश्वर थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Demand for pedestrian bridge at Nandgaon railway crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.