पिकांचे पंचनामे, सरसकट पिककर्ज माफीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:01 PM2019-11-03T23:01:05+5:302019-11-03T23:01:53+5:30

जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा पिकले तेव्हा तुम्ही लुटले अन आता तुमचे आमचे मिटले असे सांगून कर्ज भरणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत सांगितले.

Demand for pardon, crop pickup, waiver of crop immediately | पिकांचे पंचनामे, सरसकट पिककर्ज माफीची मागणी

पिकांचे पंचनामे, सरसकट पिककर्ज माफीची मागणी

Next
ठळक मुद्देजळगाव नेऊर : धुळगाव येथे सरकार विरोधात शेतकऱ्यांची एल्गार परिषद

जळगाव नेऊर : आता रडावयाचे नाही लढायचे, प्रांत कार्यालयावर लवकरच आंदोलन होणार आहे, तयार रहा. आम्हाला पिककर्ज द्या मध्यममुदत नको. कांदा असताना भाव दिला नाही आज आमच्याकडे कांदा शिल्लक नाही व भाव वधारले आहेत. आज एकाही शेतकºयाकडे कांदा शिल्लक नाही जेव्हा पिकले तेव्हा तुम्ही लुटले अन आता तुमचे आमचे मिटले असे सांगून कर्ज भरणार नसल्याचे शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे यांनी धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत सांगितले.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला कोणी येणार नाही ते शेतकºयांना स्वत:ला सोडवावा लागेल. बँकांनी वसूली करीता नोटीसा तयार केलेल्या आहेत, जमिनीची जप्ती झाल्यास आपला उतार्यातुन हक्क सोडावा लागेल, आज एक शेतकºयाचा लिलाव होईल उद्या आपली वेळ येईल, विजबिले न भरल्यास रोहित्र मिळत नाही. सहा महिन्यांपासून कृषी पंप बंद आहे, विजबिले कशाचे मागता? जगाच्या पोशिंद्याला शासनाने वाचविले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी परिषदेचे आयोजक प्रा. शिवाजी भालेराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, प्रहारचे हरिभाऊ महाजन, एकनाथ गायकवाड, राजेन्द्र गायकवाड आदिंसह धुळगाव येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते.
मागील वर्षी दुष्काळ आण िचालु हंगामात परतीच्या पावसाने उभी पिके सडली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला आर्थिक सक्षम करावे लागेल याकरिता येथील हनुमान मंदिरात आजची सभा बोलविली होती.
यावेळी प्रा. शिवाजी भालेराव व संजय सोमासे म्हणाले कि निवडणुका संपल्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे. मात्र राज्यातल्या शेतकºयांच्या गळ्याभोवती अस्मानी-सुलतानी संकटांचा फास आवळला जात आहे. सेना भाजपा सरकारची फसवी कर्जमाफी, मागील वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून वंचित राहिलेला शेतकरी, ३ वर्षापासून पिककर्जाचे वाटप नाही.
जिल्हा बँकेचे ठप्प झालेले व्यवहार यामुळे शेतकरी उद्वस्त झाला आहे. परतँच्या पावसाने हातातोंडाशी आलेले कपाशी, मका, सोयाबिन, लाल कांदा आदी पिकाचे नुकसान झाले आहे. मागील दोन हंगामात शेतकºयांनी सोने तारण ठेवून पिके उभी केली. मात्र गेल्या वर्षीचा कोरडा आण ियंदाचा ओला दुष्काळाने शेतकरी देशोधडीला लागला. तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नसल्याचे भालेराव व सोमासे म्हणाले.

(फोटो 0३ धुळगाव)
येवला तालुक्यातील धुळगाव येथे किसान क्र ांती एल्गार परिषदेत संबोधित करताना संतु पाटील झांबरे, व उपस्थित ग्रामस्थ.

Web Title: Demand for pardon, crop pickup, waiver of crop immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.