संत सेना आर्थिक विकास महामंडळ  स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:44 AM2019-08-26T01:44:45+5:302019-08-26T01:45:04+5:30

नाशिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसह अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 Demand for establishment of Sant Sena Economic Development Corporation | संत सेना आर्थिक विकास महामंडळ  स्थापन करण्याची मागणी

संत सेना आर्थिक विकास महामंडळ  स्थापन करण्याची मागणी

Next

नाशिक : नाशिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसह अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सकल नाभिक समाजाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाभिक समाज स्वातंत्र्योत्तर काळापासून आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज असून, अनेक वर्षांपासून समाजाच्या वतीने मोर्चे, आंदोलन, उपोषण करूनदेखील शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नाही. शासनाने प्रलंबित मागण्यांबाबत कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आर्थिक विकासासाठी सबलीकरणासाठी श्री संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, सलून कारागिरांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण अकादमीची स्थापना करून वसतिगृहाची सोय करण्यात यावी, नाभिक व्यवसाय करीत असलेल्या टपरीधारक, गाळाधारकांना व्यवसायासाठी त्यांच्या मालकीची जागा द्यावी. निवेदनावर सकल नाभिक संघाचे शंकरराव वाघ, यशवंत अहिरे, दिलीप तुपे, विलास भदाणे, अनिल वाघ, राजेंद्र अहिरे, राजेंद्र कोरडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
सलून व्यावसायिक व कारागिरांसाठी वयाच्या ५५ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता योजना लागू करावी, पन्हाळगडावर वीर शिवा काशिद व प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे स्मारक व्हावे, सलून व्यवसाय करण्यासाठी तसेच दुकानदारासाठी पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मेक इन इंडिया या अंतर्गत १५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे त्याच्या परत फेडीची मुदत ५ वर्ष कालावधीनंतर व्हावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title:  Demand for establishment of Sant Sena Economic Development Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक