‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:25 PM2020-01-13T15:25:21+5:302020-01-13T15:37:20+5:30

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या  पुस्तकातील  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडताना दिसत आहे. नाशिकमधील मराठा संघटनांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन भारपा व केंद्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. 

Demand for a book on 'Today's Shivaji - Narendra Modi' | ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बंदीची मागणी

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बंदीची मागणी

Next
ठळक मुद्देछावा क्रांतीवीर सेनेची आक्रामक भूमिका‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदीची मागणी

नाशिक : भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या  पुस्तकातील  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडताना दिसत आहे. नाशिकमधील मराठा संघटनांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन भारपा व केंद्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. 
भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाºया पुस्तकाचे प्रकाशन करून  काय साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असा सवाल उपस्थित करतानाच भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्याने शिव भक्तांमध्ये तीव्र रोष असून अशाप्रकारे वाद निर्माण क रणाºया घटकांना वेळेत लगाम घातला नाही तर त्यांचा संघटनेच्या माध्यमातून समाचार घेण्याचा इशारा छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय  युगपुरुष आहेत. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नससल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे आचार ,विचार आत्मसात करण्याचे आवाहन करतानाच स्वत:च पुस्तक छापून प्रतिमेच्या शेजारी प्रतिमा छापली म्हणजे कोणही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करू पाहत  असेल अशा नमोरुग्णांना वेळीच आवर घालण्यात यावा अन्यथा अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रा.उमेश शिंदे, विजय खर्जुल, राजू देसले, संतोष माळोदे , नितीन सातपुते ,निलेश मोरे ,सागर पवार ,वैभव दळवी ,अर्जुन शिरसाठ ,सुभाष गायकर ,मनोरमा पाटील ,अयाज काजी,नाशीर पटेल ,नरेंद्र भगडे ,इस्माईल शेख,गणेश पवार ,गणेश ढिकले ,दीपक जगताप ,गणेश काजळे ,भरत निसाळ ,सुरेश पाटील ,गणेश गायकवाड ,अनिल गुंजाळ ,अनिल मेघाल, आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for a book on 'Today's Shivaji - Narendra Modi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.