अधिकाऱ्यांना कचºयाचा हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 01:21 AM2020-02-15T01:21:05+5:302020-02-15T01:21:35+5:30

सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे आणि विभागीय अधिकारी डॉ. सोमनाथ वाडेकर यांना कचºयाचा हार घालत संताप व्यक्त केला.

 Defeat for the authorities | अधिकाऱ्यांना कचºयाचा हार

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे यांना कचºयाचा हार घालून निषेध नोंदवितांना सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, प्रतिभा पवार, हर्र्षा बडगुजर तसेच रत्नमाला राणे, श्यामकुमार साबळे, सुदाम डेमसे, कल्पना चुंभळे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, भाग्यश्री ढोमसे, नाना निकुंभ आदी.

Next
ठळक मुद्देसभागृहाची केली कचराकुंडी : घंटागाडी बंद, कचºयाचे ढीग साचल्याने नगरसेवक आक्रमक

सिडको : सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनील बुकाणे आणि विभागीय अधिकारी डॉ. सोमनाथ वाडेकर यांना कचºयाचा हार घालत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे सभागृहात कचराफेक आंदोलन करून
अक्षरश: कचराकुंडी केली. येत्या सोमवारपर्यंत सिडकोतील घंटागाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनपा आयुक्तांच्या दालनात ‘कचरा फेक’ आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला.
सिडको आणि सातपूर विभागांसाठी यापूर्वी जीटी पेस्ट कंट्रोल कंपनीचा ठेका होता. परंतु अनियमितता आणि कराराचा भंग होत असल्याचा ठपका ठेवून २४ डिसेंबर रोजी आयुक्तांनी हा ठेका रद्द केला आहे. त्यानंतर अन्य ठेकेदाराला कचरा संकलन करण्यास सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र जागोजागी कचºयाचे ढीग असून, पर्यायी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक संतप्त झाले आहेत. शुक्रवारी (दि.१४) प्रभाग समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. सभापती दीपक दातीर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१४) प्रभाग समितीची सभा झाली.
स्वच्छतेचा बोजवारा
सिडको भागात घंटागाडीचा पूर्णत: बोजवारा उडाला असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाने घंटागाडीची ठेका रद्द करताना पर्यायी व्यवस्था केली नाही, असा आरोप असल्यामुळे सिडकोतील सर्वच नगरसेवक त्रस्त झाले
असून, त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात चार
घंटागाड्या सुरू कराव्या. तसेच मनपाकडे असलेल्या घंटागाड्या
या भंगारात न देता त्यातील
चांगल्या गाड्या सिडकोसाठी सुरू कराव्यात असे प्रशासनाला
निवेदन दिले.

Web Title:  Defeat for the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.