वाहनतळ दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:55 PM2019-09-18T23:55:01+5:302019-09-19T00:10:05+5:30

कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 Decision to amend vehicle fines | वाहनतळ दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय

वाहनतळ दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय

googlenewsNext

देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची सभा ब्रिगेडीयर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रारंभी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून नवनिर्वाचित सदस्य कमांडंट कर्नल बिस्त यांचा शपथविधी झाला. पार्किंगवरून गेल्या काही महिन्यांपासून नागरिक व प्रशासनात धुसफूस सुरू होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने उपाध्यक्ष कटारिया, नगरसेवक ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत ही योजना रद्द करण्याची मागणी केली. मात्र शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी ही योजना असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट झाल्यानंतर त्यात बदल करावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी उचलून धरल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले. नवे धोरण दि. १ आॅक्टोबरपासून राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
याशिवाय कॅन्टोन्मेंट जनरल रु ग्णालयात भगूर-देवळालीसह २८ खेड्यांतील नागरिक उपचारासाठी येत असून, येथील सुविधा चांगल्या असल्याने गेल्या काही वर्षांपासून रु ग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दंतरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ दररोज उपलब्ध करणेबाबत निर्णय झाला. आमदार योगेश घोलप यांच्या निधीतून ४५ लाखांची कामे मंजूर करण्यात आली. कर भरणेसाठी डेबिट व क्रेडिट कार्डची सोय, ९२ गाळ्यांचे व्यापारी संकुल बीओटी तत्त्वावर देणे, पूर्वीच्या जकात नाक्याचे शेड व जागा भाडेतत्त्वावर देणे, विद्यार्थ्यांना गणवेश, व्यापारी लायसनचे नूतनीकरण करणेबाबत निर्णय घेण्यात आला. बोर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरसेवकांचे शिष्टमंडळ जुने बस स्टॅण्ड, सिंधी पंचायत हॉल, गुरूनानी प्लाझाची मागील बाजू, जुना कोंडवाडा यांची पाहणी करून तिथे पार्किंग सुविधा देणेबाबत विचार करणार आहेत. यावेळी नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, मीना करंजकर, कावेरी कासार, कर्नल अतुल बिस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते.
दुचाकीला शुल्क नाही
पार्किंगसाठी दुचाकीला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग राहणार आहे. चारचाकीसाठी दंडात्मक रक्कम पाचशेवरून तीनशे करण्यात आली. चारचाकीसाठी हौसनरोडवर नो पार्किंग कायम असून मुख्य रस्त्यावर मुल्ला कॉम्प्लेक्स ते गुलशन टॉवर, राम भरोसे कॉम्प्लेक्स ते सेलो फोटो स्टुडिओ, महाराष्ट्र बँक ते लेव्हिट मार्केटमागे हा भाग मोफत पार्किंग म्हणून घोषित करण्यात आला.

Web Title:  Decision to amend vehicle fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.