Death of a monkey by lightning hit the moon | चांदवडला विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू
चांदवडला विजेच्या धक्क्याने वानराचा मृत्यू

चांदवड - शहर परिसरात एका वानराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसापासून एक वानर घराघरावर उड्या मारत होते .मंगळवार दि. १२ नोव्हेंबर सकाळी सात वाजेच्या सुमारास सोमवार पेठेतील फलके यांच्या दीपक रेस्टॉरंट या हॉटेलसमोर अचानक विजेचा धक्का लागून हे वानर रस्त्यावर कोसळले . परिसरातील नागरिकांनी त्यास पाणी पाजून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती सर्पमित्र मुन्ना गोसावी यांनी चांदवड वनविभागात दिली. घटनास्थळी वन परिमंडळ अधिकारी विलास तात्पूरकर , वनरक्षक गोपाळ राठोड यांनी पाहणी करून मृत वानराची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . दत्ता मोटेगावकर यांनी उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर वनविभागाच्या चंद्रेश्वर डोंगर परिसरात वानराचे दफन करण्यात आले . वानराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title:  Death of a monkey by lightning hit the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.