सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू; मनमाडमधील घटनेनं परिसरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:15 PM2021-07-28T12:15:50+5:302021-07-28T12:22:26+5:30

दोन महिलांवर काळाने झडप घातल्यानं गावावर शोककळा

daughter in law died while trying to save her mother in law from drowning in nashik | सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू; मनमाडमधील घटनेनं परिसरात हळहळ

सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही बुडून मृत्यू; मनमाडमधील घटनेनं परिसरात हळहळ

googlenewsNext

मनमाड (नाशिक) : येथील पांडुरंग नगर भागात शेतातील विहिरीवर पाणी काढताना पाय घसरून पडलेल्या सासूला वाचवण्याच्या प्रयत्नात सुनेचाही विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन महिलांवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहराच्या पश्चिम भागातील पांडुरंग नगर परिसरात राहणाऱ्या गयाबाई पवार आणि मनीषा पवार या सासू-सूना शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. या विहिरीला कठडा नाही. पाणी काढत असताना अचानक सासू गयाबाईचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.
सासू विहिरीत पडल्याचे पाहून सून मनीषाने आरडाओरडा केला. मात्र परिसरात कोणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मनीषाने साडीचा पदर विहिरीत सोडून सासूला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रयत्न करत असताना तीदेखील विहिरीत पडली. दोघींना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.मयत मनीषा हिला एक आठ वर्षाचा मुलगा व सहा व चार वर्षांच्या दोन मुली आहे.तिच्या निधनाने तीन बालकांचे मातृछत्र हरवले आहे.या बाबद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: daughter in law died while trying to save her mother in law from drowning in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.