दरेगाव पाटचारीचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:59 PM2020-01-13T22:59:40+5:302020-01-14T01:19:22+5:30

चांदवड तालुक्यातील पूर्व भागात राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामीण भागात सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थांनी ही मागणी केली.

Daregaon Patchari's work is incomplete | दरेगाव पाटचारीचे काम अपूर्ण

दरेगाव पाटचारीचे काम अपूर्ण

Next
ठळक मुद्देचांदवड : गायकवाड, अहेर यांच्या सत्कारप्रसंगी ग्रामस्थांची तक्रार


दरेगाव येथे सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार करताना बबन गांगुर्डै. समवेत नितीन अहेर, विजय गांगुर्डे, जगदीश शेळके आदी.


दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भागात राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. डॉ. सयाजीराव गायकवाड यांचा ग्रामीण भागात सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थांनी ही मागणी केली.
चांदवड तालुक्यातील ऊसवाड गावचे भूमिपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच दुगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी मिळाल्याबद्दल दुगाव गटातील दुगाव, मेसनखेडे खु, शिंगवे दरेगाव, डोणगाव आदींसह गावातील ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. गायकवाड यांचे वडील माजी आमदार स्व.डॉ.ना.का.गायकवाड यांचा त्यांना वारसा लाभला आहे. दरेगाव येथे ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने नूतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड व पंचायत समितीचे उपसभापती नितिन आहेर यांचा सत्कार करण्यात आला. दुगाव गटाचे शिवसेना अध्यक्ष दिनेश पगार यांनी प्रास्ताविक केले. राहुडपर्यंत आलेल्या पाटचारीचे काम दरेगावपर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी केली. सरपंच अमोल देवरे यांनी बंधाऱ्यांचे खोलीकरण करून गाळ काढण्याची केली. उपसभापती नितीन आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवाजी सोनवणे, भीमराव जेजुरे, विजय गांगुर्डे, सरपंच जगदीश शेळके, जगन खेमणार, तसेच सरपंच अमोल देवरे, विक्र म देवरे, पोलीसपाटील सोमनाथ गांगुर्डे, माजी सरपंच नथू देवरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे सदस्य आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र देवरे यांनी केले.

Web Title: Daregaon Patchari's work is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.