पिंपळदर गावानजीक रस्त्यावर खड्यांमुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 03:20 PM2020-08-13T15:20:20+5:302020-08-13T15:21:42+5:30

खामखेडा : पिपळदर गावानजीक असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे खड्यात पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या ठिकाणाहुन खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्याची तातडीने दुरु स्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Danger due to stones on the road near Pimpaldar village | पिंपळदर गावानजीक रस्त्यावर खड्यांमुळे धोका

पाऊसामुळे पिपळदर गावाजवळ रस्त्यावरील खड्यात साचलेले पाणी.

Next
ठळक मुद्देवाहन चालक भयभीत : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : पिपळदर गावानजीक असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे खड्यात पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या ठिकाणाहुन खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्याची तातडीने दुरु स्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. वाहन चालविताना चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला तरी संबंधित खात्याला मात्र काहीच सोयरसुतक नाही. नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा-कळवण-नाशिक हा राज्य मार्ग क्र मांक - २७ असून सदर रस्त्यावरील पिंपळदर गावानजीक मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचत असल्याने हे खड्डे लक्षात येत नाहीत यामुळे वाहने खड्यात आपटून नुकसान होत असून अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे.
राज्य महामार्गावरून नवापूर, नंदुरबार, धुळे आदी खान्देश भागातील भाविकांना सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी हा सोयीस्कर रस्ता असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते, तसेच सापुतारा, नाशिक जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता सोयीस्कर असल्याने या रस्त्याचा जास्त वापर होत असतो.
येथे वाहनचालकास पाण्यामुळे खठ्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा वाहन चालकांमध्ये वाद निर्माण होतात.
हा मुख्य रस्ता रहदारीचा भार असलेला मार्ग सुस्थितीत असणे गरजेचे असते. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुलेक्ष्य करीत आहे. बांधकाम विभागाची डोळेझाक नागरिकांच्या जीवावर बेतली जात आहे.

Web Title: Danger due to stones on the road near Pimpaldar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.