शहरात दांडिया, गरबाची उत्साहात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:52 AM2019-10-01T01:52:05+5:302019-10-01T01:52:30+5:30

नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, देवींच्या मंदिरांसह अनेकांच्या घरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या मंडपात देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. त्यामुळे सोमवारपासूनच सार्वजनिक मंडळांमध्ये दांडिया, गरबाची खेळण्यासाठी सुरुवात झाली आहे.

 Dandiya in the city, the start of the heat wave | शहरात दांडिया, गरबाची उत्साहात सुरुवात

शहरात दांडिया, गरबाची उत्साहात सुरुवात

Next

नाशिक : नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, देवींच्या मंदिरांसह अनेकांच्या घरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या मंडपात देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. त्यामुळे सोमवारपासूनच सार्वजनिक मंडळांमध्ये दांडिया, गरबाची खेळण्यासाठी सुरुवात झाली आहे. यामुळे तरणाईमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.
नवरात्रोत्सव म्हटलं की प्रत्येकामध्ये उत्सुकता असते ती दांडिया आणि गरबाची. या उत्सवात सर्वजण दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात. शहरातील नंदनवन लॉन्स, रेडक्रॉस सोसायटी, अशोकनगर, राणेनगर, रविवार कारंजा, पंचवटी, कच्ची लोहाणा, द्वारका भागांत दांडिया व गरबाची सुरुवात झाली असून, तरुणी तसेच महिला घाघरा, चोली आणि ओढणी परिधान करत तर पुरु ष पारंपरिक धोती आणि कुर्ता परिधान करत दांडिया खेळण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे. गरबामध्ये हिंच, दोडियो, पोपटीयो, दोन ताली, छगडी, रास गरबा, टिटाडा प्रकार खेळले जात आहे. यासाठी तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळांमध्ये तसेच अनेक संस्था गरबा व दांडिया स्पर्धांचे आयोजन करतात.
बाजारात गरब्याचे साहित्य
नवरात्रोत्सवात तरुण-तरु णींचा उत्साह शिगेला पोहचत असतो. तसेच उत्सवात अनेक मंडळे, संस्था गरबा, दांडियाच्या स्पर्धा आयोजित करत असतात. त्यासाठी तरुणांचा याला मोठा प्रतिसाद मिळत असतो. गरबा, दांडिया खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, कपडे खरेदीला या दिवसांत मागणी वाढत असल्यामुळे बाजारात साहित्य उपलब्ध झाले आहे. यात निरनिराळ्या प्रकारच्या दांडिया, गुजराथी-मारवाडी प्रकारचे कपडे, तरुणींचे दागिने बाजारात बघायला मिळत आहे.

Web Title:  Dandiya in the city, the start of the heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.