अतिवृष्टीमुळे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:54 AM2019-08-10T00:54:16+5:302019-08-10T00:54:44+5:30

जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

Damage of crops on 3,000 hectares due to heavy rainfall | अतिवृष्टीमुळे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे २१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देप्राथमिक अहवाल : ३२ हजार शेतकरी बाधित

नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचानामे सुरू करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर ३२ हजार ४३३ शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सर्वाधिक नुकसान हे निफाड आणि इगतपुरी तालुक्यांत झाल्याची नोंद करण्यात आली आहे, तर बाधीत होणाऱ्या घरांची संख्या दिंडोरी तालुक्यात अधिक आहे. दरम्यान, प्राप्त होणाºया अहवालानुसार शासनाकडे तत्काळ मदतीसाठी अहवाल पाठविणार जाणार आहे.
जिल्ह्यातील भयंकर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रांताने दिले असून, त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी पथके तयार करून शुक्रवारपासून (दि.९) पंचनामे सुरू केले आहेत. प्राथमिक अहवालात २१ हजार ९०१ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची माहिती समोर आली असून, ८८ गावे बाधीत झाली आहे, तर ३२ हजार ४३३ शेतकºयांना शेत नुकसानीचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि धरण क्षेत्रात झालेल्या विक्रमी पावसामुळे धरणातून विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला आलेल्या महापुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले
होते. एनडीआरफच्या पथकाबरोबरच जिल्हा आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मदतकार्य करण्यात आले. पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे बाधित झाली, तर शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला. उभी पिके पाण्यात गेल्यामुळे त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. दोन ते तीन दिवसांपासून लोक आपल्या घराकडेदेखील परतलेले नाही तर पुराची परिस्थिती भीषण असल्यामुळे लोक अजूनही पुरातून सावरलेले नाही.
तालुकानिहाय बाधित झालेली गावे, क्षेत्र
प्रांताधिकाºयांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची महिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार नाशिक तालुक्यात ८८ गावे बाधित आहेत, तर २५,७३ हेक्टर पिके बाधित झाली आहेत. इगतपुरीत १२६ गावे, ९३९० शेतकरी बाधीत आहेत, तर १०३४९ हेक्टर पिके पाण्यात गेली आहेत. देवळा येथील सात गावांमध्ये ३४ हेक्टर, पेठ तालुक्यातील १४५ गावांमधील २१२ कुटुंबे बाधित आहेत, तर ३४ टक्के पिके अडचणीत आले आहेत. बागलाणमधील १४५ गावे, २२२ शेतकरी बाधित आहेत. पेठमध्ये ५५९ हेक्टर इतक्या पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बागलाणमध्ये ३९ गावे तर ८०७ शेतकरी अडचणीत आहेत. निफाडमध्ये ४९ गावे बाधीत आहेत ६२१७ क्षेत्र, तर ३५०० शेतकरी बाधित आहेत. दिंडोरीत १५६ गावे, ४०० हेक्टर क्षेत्र, ७०० शेतकरी बाधित, त्र्यंबकेश्वर ८६ बाधित गावे आहेत, तर ६२० हेक्टर क्षेत्र तर ८५० शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाणा ३३ गावे ४८ हेक्टर क्षेत्र तर ७४ बाधित शेतकºयांची संख्या आहे. सिन्नर तालुक्यात २८ गावे बाधित असून, ५६१ हेक्टर क्षेत्र, तर ११७६ बाधित शेतकºयांची संख्या आहे. कळवणमधील अवघे गाव बाधित आहे. या गावातील ०.६४ क्षेत्र बाधित आहे, तर ५ शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहेत.

Web Title: Damage of crops on 3,000 hectares due to heavy rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.