मालेगावी किसान सभेची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:31 PM2020-09-21T22:31:47+5:302020-09-22T00:57:04+5:30

मालेगाव : माकपाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पात्र दावेदारांच्या वनजमिनी मंजूर करून वास्तव्य करणाऱ्या लोकांना सिंगल फेज वीजजोडणी द्यावी, कोरोनाकाळात प्रति व्यक्ती पंधरा किलो धान्य व एक किलो साखर व डाळ मोफत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Dam of Malegaon Kisan Sabha | मालेगावी किसान सभेची धरणे

वनदावे लवकर निकाली काढावेत, माकपा नेते सीताराम येचुरी यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी मालेगावी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना किसान सभेचे पदाधिकारी व आदिवासी बांधव.

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : वनदावे निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : माकपाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पात्र दावेदारांच्या वनजमिनी मंजूर करून वास्तव्य करणाऱ्या लोकांना सिंगल फेज वीजजोडणी द्यावी, कोरोनाकाळात प्रति व्यक्ती पंधरा किलो धान्य व एक किलो साखर व डाळ मोफत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी प्रांताधिकारी विजय आनंद शर्मा यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सोमवारी दुपारी पोलीस कवायत मैदानावर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कांदा निर्यातबंदी उठवावी, गरजूंना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, येथील वनजमिनी दावेदारांवर झालेला अन्याय दूर करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.
आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, हनुमंत गुंजाळ, शफीक अहमद, राजाराम अहिरे, मधुकर सोनवणे, उत्तम निकम, अर्जुन ठाकरे, रवि पवार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

Web Title: Dam of Malegaon Kisan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.