नाशकात रविवार होणार ‘सायकलवार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:24 PM2020-01-12T23:24:43+5:302020-01-13T00:55:56+5:30

नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजावी आणि नागरिकांनी अधिकाधिक सायकलचा वापर करावा, तसेच पर्यावरणाचा संदेश देत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कालपासून ‘रविवार सायकल वार’ या उपक्र माला सुरुवात करण्यात आली. रविवारी (दि.१२) सकाळी ७ वाजता भोसला चौक येथे सुरू झालेली सायकल राईड कॉलेजरोड मार्गे जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल मार्गे पुन्हा भोसला चौकात येऊन पार पडली.

'Cyclewar' will be Sunday in Nashik! | नाशकात रविवार होणार ‘सायकलवार’!

नाशकात रविवार होणार ‘सायकलवार’!

googlenewsNext

नाशिक : नाशिकमध्ये सायकल चळवळ रूजावी आणि नागरिकांनी अधिकाधिक सायकलचा वापर करावा, तसेच पर्यावरणाचा संदेश देत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने कालपासून ‘रविवार सायकल वार’ या उपक्र माला सुरुवात करण्यात आली. रविवारी (दि.१२) सकाळी ७ वाजता भोसला चौक येथे सुरू झालेली सायकल राईड कॉलेजरोड मार्गे जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल मार्गे पुन्हा भोसला चौकात येऊन पार पडली.
प्रत्येक रविवारी शहरातील एका ठराविक भागामध्ये सायकल राईड घेतली जाणार आहे. त्या परिसरातील नागरिकांना नाशिक स्मार्ट सिटी आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने या सायकल राईडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रविवार सायकल वार राईडसाठी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्मार्ट सिटीचे कंपनीचे सचिव महेंद्र शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर राईडला सुरुवात झाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नाकर अहेर आणि त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. या राईडमध्ये स्मार्ट सिटीचे उपमहाव्यवस्थापक विनोद पाटील, प्रकल्प व्यवस्थापक हर्षद वाघ,जनसंपर्कअधिकारी प्रशांत चिडे, दुर्गेश ओझरकर, अभिषेक जैन, सचिन मोरे, विशाल उगले, श्रीकांत जोशी, नीता नारंग, नंदकुमार पाटील, डॉ. मनीषा रौंदळ, सोफिया कपाडिया, हिमानी पुरी, रविकिरण लोखंडे, दीपक भोसले, रवींद्र दुसाने, नाना फड, संजय सांगळे आदी या राईडमध्ये सहभागी झाले होते.
सर्वांना सहभाग खुला
सायकल आपल्याजवळ असली किंवा नसली तरीही या राईडमध्ये सहभागी होऊ शकत असल्याचे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले. ज्यांच्याजवळ सायकल आहे, ते सायकल घेऊन येऊ शकतात. ज्यांच्याजवळ सायकल नाही, त्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली सायकल राईडच्या ठिकाणी सायकल घेता येईल, असेही नमूद करण्यात आले. त्याशिवाय प्रजासत्ताक दिनी अर्थात २६ जानेवारीला शहरातील निर्धारित सायकलिस्ट फेरी मारून म्हणजेच ‘सिटी रायडिंग’च्या माध्यमातून सायकलिंगबाबत जनजागृती करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

Web Title: 'Cyclewar' will be Sunday in Nashik!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.