नाशिकरोड रेल्वेस्थानकावरही परप्रांतीयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:16 AM2021-04-10T01:16:28+5:302021-04-10T01:16:56+5:30

राज्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मुंबई, ठाणे, नाशिक व इतर भागात राहणारे परप्रांतीय पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. रेल्वे स्थानकात कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवेश देत नसल्याने परप्रांतीयांची द्विधा मनस्थिती झाली असून, चोर मार्गाने रेल्वेस्थानकात प्रवेश करून परप्रांतीय रेल्वेत बसून निघून जात आहे.     

Crowds of foreigners at Nashik Road railway station | नाशिकरोड रेल्वेस्थानकावरही परप्रांतीयांची गर्दी

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरही परप्रांतीयांची गर्दी

Next
ठळक मुद्देचोरट्यामार्गाने प्रवेश : विनातिकीट प्रवाश्यांची संख्या वाढली

नाशिकरोड : राज्यात पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने लॉकडाऊनच्या भीतीने मुंबई, ठाणे, नाशिक व इतर भागात राहणारे परप्रांतीय पुन्हा घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. रेल्वे स्थानकात कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय प्रवेश देत नसल्याने परप्रांतीयांची द्विधा मनस्थिती झाली असून, चोर मार्गाने रेल्वेस्थानकात प्रवेश करून परप्रांतीय रेल्वेत बसून निघून जात आहे.     
रेल्वेचे १२० दिवस अगोदर आरक्षण तिकीट काढता येते. मुंबईहून बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, नागपूर, दिल्ली आदी ठिकाणी जाणाऱ्या जवळपास सर्वच लांब पल्ल्यांच्या रेल्वेचे आरक्षण हाऊसफुल झाले आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने ५ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत पुन्हा लॉक डाऊन जाहीर केला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे व या काळात कोणीही रस्त्यावर विनाकारण न फिरण्यासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. पुन्हा तशीच भीती काही परप्रांतीयामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या घरी जाण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली आहे. कन्फर्म आरक्षण तिकीट असल्याशिवाय रेल्वे स्थानकात कोणालाच प्रवेश दिला जात नाही. 
जादा रेल्वे सोडण्याची गरज
मुंबई, ठाणे या भागातील परप्रांतीयांची आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी वाढू लागली आहे. अशीच परिस्थिती येत्या काही दिवसात नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून केंद्र शासनाने आत्ताच इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढवून भीती, घबराट, गोंधळ टाळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
चोरट्या मार्गाचा अवलंब
नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे सर्व प्रवेशद्वार बंद असले तरी प्लॅटफॉर्म क्रमांक चार, चेहेडी पंपिंग रस्त्याकडील रेल्वे स्थानकात येणारा रस्ता, मालधक्का, तसेच इतर  ठिकाणहून भिंतीवरून उडी मारून स्थानकात प्रवेश करून विनातिकीट निघून जात आहे. रेल्वे स्थानकाशी प्रवेशद्वारावरील कर्मचारी आर्थिक मिलीजुली करून प्रवेश देत आहे. 

Web Title: Crowds of foreigners at Nashik Road railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.