लॉकडाऊनच्या धास्तीने पिंपळगावात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:14 PM2021-05-11T23:14:01+5:302021-05-12T00:38:44+5:30

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला असून राज्यातल्या विविध जिल्ह्यात, शहरांत, गावात, गल्लीत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. १२ मे पासून २२ मे पर्यंत संचारबंदी राहणार असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी उसळली असून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याचे काम मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होताना दिसून आले.

Crowds erupted in Pimpalgaon due to fear of lockdown | लॉकडाऊनच्या धास्तीने पिंपळगावात उसळली गर्दी

लॉकडाऊनच्या धास्तीने पिंपळगावात उसळली गर्दी

Next
ठळक मुद्देमाणसे अन‌् वाहनांच्या गर्दीने रस्ते, बाजारपेठा झाल्या जाम

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला असून राज्यातल्या विविध जिल्ह्यात, शहरांत, गावात, गल्लीत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. १२ मे पासून २२ मे पर्यंत संचारबंदी राहणार असल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी उसळली असून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याचे काम मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होताना दिसून आले.

जिल्ह्यात १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन असल्याने कोणत्याही नागरिकांना घराच्या बाहेर पडणास सक्त मनाई असल्याने त्या धास्तीमुळे लोक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. परिणामी तालुक्यातील बाजारपेठेत मंगळवारी सकाळपासूनच गर्दी उसळली. प्रशासनातर्फे अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंदचे आवाहन केले तरी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गर्दीमुळे कोरोना नियमांचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र होते. त्यामुळे अधिक कडक नियम लादून बंद पुकारण्यात आल्याने बाजारपेठेत गर्दी उसळली. नागरिकांनी किराणा मालासह इतर खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत रांगा लावल्या. त्यातच भाजीसह अन्य विक्रेतेही रस्त्यावर ठाण मांडल्याने मंगळवारी (दि.११) पिंपळगाव शहरात आठवडा बाजाराचे स्वरुप आले होते.
कुठेही सोशल डिस्टंन्सिंग नव्हते. अनेक जण मास्कविनाच बाजारात फिरत होते. शहरातील सर्वच दुकाने उघडल्याने मोठी गर्दी दिसून आली. पंधरा दिवसांचा लॉकडाऊन गृहित धरून नागरिकांची संसार साहित्याचा साठा करण्याची धडपड पहायला मिळाली. या अनुषंगाने पिंपळगाव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी वाहनांद्वारे शहरातून फेरफटका मारला. ध्वनीक्षेपकावरून आवाहन करीत असतानाच दुकाने बंद झाली नाहीत तर कारवाईचा इशाराही देण्यात येत होता. परंतु दुकाने सुरूच राहिली. विनामास्क फिरणाऱ्यांवर मात्र पोलीस पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली होती.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंसह दुचाकी, चारचाकी वाहन, सोने बुकींगसाठी आजच काही नागरिकांनी संबंधित दुकानांचा दरवाजा ठोठावला. या गर्दीने बाजारपेठेत उत्साह दिसून आला होता. पेट्रोल पंपवारदेखील झुंबड उडाली होती.

पेट्रोल भरून जाणार कुठे?
दहा दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला आहे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या वाहनधारकांनाच पेट्रोल बंधनकारक केले आहे. मग हा कडकडीत लॉकडाऊन असताना पेट्रोल भरून नागरिक नेमके जाणार तरी कुठे ? पेट्रोल पंपावर एवढी गर्दी करत आहेत आणि कोरोनाला आमंत्रण देत आहे असा सवाल या गर्दीला पाहता उपस्थित होत आहे,
 

Web Title: Crowds erupted in Pimpalgaon due to fear of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.