कोनांबे येथे तीन गावांसाठी तलाठी सजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:08 PM2020-08-06T22:08:02+5:302020-08-07T00:31:29+5:30

सिन्नर : धोंडबार आणि औंढेवाडी या आदिवासी, दुर्गम भागात असलेल्या गावकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतीसंदर्भातील इतर महसुली कागदपत्रांच्या कामांसाठी २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे जावे लागे. मात्र, आता धोंडबार, औंढेवाडी आणि कोनांबे या तीन गावांसाठी कोनांबे येथे नवीन तलाठी सजाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तीनही गावांतील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार आहे.

Creation of Talathi punishment for three villages at Konambe | कोनांबे येथे तीन गावांसाठी तलाठी सजाची निर्मिती

कोनांबे येथे तीन गावांसाठी तलाठी सजाची निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देजुनी मराठी शाळेच्या इमारतीत नवीन अद्ययावत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन

सिन्नर : धोंडबार आणि औंढेवाडी या आदिवासी, दुर्गम भागात असलेल्या गावकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतीसंदर्भातील इतर महसुली कागदपत्रांच्या कामांसाठी २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे जावे लागे. मात्र, आता धोंडबार, औंढेवाडी आणि कोनांबे या तीन गावांसाठी कोनांबे येथे नवीन तलाठी सजाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तीनही गावांतील शेतकऱ्यांची पायपीट थांबणार आहे.
महसूल दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते डॉ. आर. व्ही. गोºहे आणि सरपंच संजय डावरे यांच्या हस्ते कोनांबे येथे या तलाठी कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. महसुली कामांसाठी धोंडबार आणि औंढेवाडी येथील ग्रामस्थांना २५ किमी अंतरावर असलेल्या आगासखिंड येथे तर कोनांबेकरांना ३ किमी अंतरावरील सोनांबे येथील तलाठी कार्यालयात जावे लागे. आता मात्र तीनही गावातील शेतकºयांची गैरसोय दूर होणार आहे.
कोनांबे गावातील जुनी मराठी शाळेच्या इमारतीत नवीन अद्ययावत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन तलाठी कार्यालयासाठी गावातील पाणी फाउण्डेशन टीमने टेबल उपलब्ध करून दिले तर सरपंच संजय डावरे यांनी १५ दिवसांच्या आत लोकवर्गणीतून लॅपटॉप आणि अन्य सामग्री देत कार्यालयाला अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मंडल अधिकारी अण्णा डावरे, तलाठी हरणे, उपसरपंच रंजना भागवत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Creation of Talathi punishment for three villages at Konambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.