मालेगावी गटारीच्या चेंबरमध्ये पडली गाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:08+5:302021-07-28T04:16:08+5:30

सोयगाव : मालेगावी सटाणा रोडवर टेहरे चाैफुलीवर असलेल्या भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये सायंकाळी गाय पडल्याने तिला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी ...

The cow fell into the gutter chamber of Malegaon | मालेगावी गटारीच्या चेंबरमध्ये पडली गाय

मालेगावी गटारीच्या चेंबरमध्ये पडली गाय

googlenewsNext

सोयगाव : मालेगावी सटाणा रोडवर टेहरे चाैफुलीवर असलेल्या भूमिगत गटारीच्या चेंबरमध्ये सायंकाळी गाय पडल्याने तिला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी अग्निशमन दलाचे जवान तेथे पोहोचल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गाय काढण्याचे प्रयत्न सुरू होते. भूमिगत गटाराच्या चेंबरला झाकण न बसविल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. टेहरे चौफुलीवरील गटारीचे चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून उघडे पडले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून जोरदार पाऊस झाल्यास या भागात पाणी साचून चेंबरमध्ये पादचारी किंवा लहान मुले पडून त्यांना प्रणास मुकावे लागण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. रात्री तर नागरिकांसह दुचाकीसह वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या भागातील नागरिकांनी अनेकदा चेंबरला झाकण बसविण्याची मागणी केली; मात्र मनपाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात होता. गटारीच्या चेंबरमध्ये गाय पडल्याचे श्याम बच्छाव, श्रीकांत शेवाळे यांच्या लक्षात आले. श्याम बच्छाव यांचे चौफुलीवर सर्विस सेंटर आहे. उपमहापौर नीलेश आहेर, शिवसेनेचे नेते मनोहर बच्छाव, दिलीप बच्छाव, नंदू बच्छाव यांनीही पाहणी करून मनपाच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मनपाचे जेसीबी मागविण्यात आले. अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा गायीला चेंबरमधून बाहेर काढण्यात यश आले. मालेगाव शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली असून, मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (२७ मालेगाव १)

270721\27nsk_36_27072021_13.jpg

२७ मालेगाव१

Web Title: The cow fell into the gutter chamber of Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.