घर खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी मनपाची हेल्पाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:30 PM2021-02-19T17:30:22+5:302021-02-19T17:33:38+5:30

नाशिक- घर खरेदी करताना त्याची विक्री करणाऱ्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि नंतर अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. इमारतीचे बांधकाम कधी बेकायदेशीर असते तर कधी पार्शल कंप्लीशन सर्टिफिकेट असते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या इमारतीची योग्य माहिती घर खरेदी करणाऱ्यास मिळावी यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन (मदतवाहीनी) सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या या सेवेमुळे नागरीकांची घर खरेदीतील फसवणूक टळणार आहे.

Corporation helpline to prevent home purchase fraud | घर खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी मनपाची हेल्पाईन

घर खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी मनपाची हेल्पाईन

Next
ठळक मुद्देनगररचना करणार सहकार्य  बेकायदेशीर वास्तुंची माहिती कळणार

नाशिकघर खरेदी करताना त्याची विक्री करणाऱ्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि नंतर अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. इमारतीचे बांधकाम कधी बेकायदेशीर असते तर कधी पार्शल कंप्लीशन सर्टिफिकेट असते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या इमारतीची योग्य माहिती घर खरेदी करणाऱ्यास मिळावी यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन (मदतवाहीनी) सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या या सेवेमुळे नागरीकांची घर खरेदीतील फसवणूक टळणार आहे.

आयुष्यात स्वत:च्या मालकीचे घर असावे ही सर्वांचीच इच्छा असते. अनेक जण तर घर खरेदीसाठी आयुष्याची पुंजी लावून देतात. परंतु घर खरेदीसाठी योग्य ती माहिती न घेतल्यास फसवणूकीची शक्यता असते. एखाद्या इमारतीत अतिरीक्त बांधकाम विकासकाडून झालेले असते. तर एखाद्या इमारतीत पार्कीगच्या जागेवर गाळे किंवा तत्सम अनेक प्रकार घडलेले असते. काही घरातील अर्धवट कंपलीशन असते. घर घेताना अपुरी माहिती मिळाल्यनंतर किंवा कमी किमतीत मिळते म्हणून घाईघाईने नागरीक घर खरेदी करतात. आणि नंतर अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. सातपूरच्या कामगार नगरजवळील स्वागत हाईटस मध्ये असाच प्रकार घडला हेाता तर अनेक भागात इमारतींना कंप्लीशन सर्टिफीकेट नसल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे आढळले होते. त्या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त  कैलास जाधव यांनी ही हेल्पलाईन सुरू  करण्याची कल्पना मांडली हेाती. त्यानुसार महापालिकेने ०२५३- २३१००३१ ही हेल्पलाईन सुरू करण्यात केली आहे त्यावर कार्यालयीन वेळेत दूरध्वनी केल्यास महापालिकेकडून त्या इमारती विषयी अधिक माहिती मिळू शकते.

घर नियमानुसार आहे किंवा नाही. बांधकाम सुरू केले असेल तर त्यासाठी परवानगी घेतली आहे किंवा नाही याबाबत माहिती दिली जाईल. ज्यांना महापालिकेत येऊन समक्ष हवी माहिती हवी असेल त्यांच्यासाठी शिवार निहाय कनिष्ठ अभियंता नियुक्त करण्यात आले असून ते सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत उपलब्ध हेातील.

 

Web Title: Corporation helpline to prevent home purchase fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.