कोरोनाबाधित पुन्हा पाच हजारपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:51+5:302021-04-16T04:14:51+5:30

नाशिक : काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, गुरुवारी (दि. १५) ५०६७ रुग्ण बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात ...

Coronabadhit again five thousand! | कोरोनाबाधित पुन्हा पाच हजारपार !

कोरोनाबाधित पुन्हा पाच हजारपार !

Next

नाशिक : काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, गुरुवारी (दि. १५) ५०६७ रुग्ण बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात प्रलंबित अहवाल प्राप्त होत असून, कोरोना रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा आणि एकाच दिवसात ३५ बळी गेले आहेत. आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २८१६ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हेच प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २९३५, तर नाशिक ग्रामीणला १९९८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ८८ व जिल्हाबाह्य ४६ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १९, ग्रामीणला १६ असा एकूण ३५ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत आठवड्यात मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर सामान्य नागरिकांकडून व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

उपचारार्थी रुग्णसंख्या ३८ हजारांवर

जिल्ह्यात ज्या वेगाने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ३८ हजार ५८० वर पोहोचली आहे. त्यात २१ हजार ७८२ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १४ हजार ५९९ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, एक हजार ८९५ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३०५ रुग्णांचा समावेश आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल सात हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या वाढलेली होती. गत दोन दिवस प्रलंबित अहवालाने दहा हजारांचा आकडा ओलांडला होता. मात्र, त्यात गुरुवारी अधिक प्रमाणात प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या ७६४७वर आली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ४१६२, नाशिक मनपा क्षेत्रातील २९०९, तर मालेगाव मनपाचे ५७६ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबितची संख्या अद्याप वाढलेली असल्याने पुढचे चार दिवस बाधितांच्या प्रमाणात वाढ राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Coronabadhit again five thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.