सावट कोरोनाचे : शहाजहांनी ईदगाह पडले ओस; सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदचे नमाजपठण घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 PM2021-07-21T16:07:20+5:302021-07-21T16:19:15+5:30

त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचेही विशेष नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहाजहांनी ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही.

Corona impact : Shahajangi Eidgah remains vacant, people offer prayer at home | सावट कोरोनाचे : शहाजहांनी ईदगाह पडले ओस; सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदचे नमाजपठण घरातच!

सावट कोरोनाचे : शहाजहांनी ईदगाह पडले ओस; सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईदचे नमाजपठण घरातच!

googlenewsNext
ठळक मुद्देमशिदींभोवती कडा पहाराकोरोनाच्या उच्चाटनासाठी 'दुआ'लगबग अन‌् रौनक हरविली; ईदगाह पडले ओस

नाशिक : इस्लामी संस्कृतीतील सणांपैकी 'ईद-उल-अज्हा' अर्थात बकरी ईददेखील मोठा सण म्हणून ओळखला जातो. मागील वर्षीप्रमाणे यंदाही बकरी ईद कोरोनाच्या सावटाखाली शहर व परिसरात पारंपरिक पध्दतीने साजरी करण्यात आली. सामुहिकरित्या नमाजपठणाऐवजी नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच ईदची नमाज अदा केली. या पवित्र दिनाच्या औचित्यावर नमाजपठणादरम्यान समाजबांधवांनी कोरोनाचे समुळ उच्चाटन व्हावे, यासाठी 'दुवा' मागितली..

त्याग आणि बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईद बुधवारी (दि.२१) शहर व परिसरात शांततेत साजरी झाली. रमजान ईदप्रमाणे या ईदचेही विशेष नमाजपठणाचा सामुहिक सोहळा शहाजहांनी ईदगाह मैदानावर कोरोनाच्या निर्बंधामुळे होऊ शकला नाही. तसेच मशिदींमध्येही गर्दी उसळू नये यासाठी सामूहिक नमाजपठणावर निर्बंध घालण्यात आले होते. पहाटेपासूनच शहरासह उपनगरांमध्येही मशिदींभोवती पोलिसांचा कडा पहारा रात्रीपर्यंत पहावयास मिळाला. मध्यरात्रीपासून पावसाची संततधारदेखील सुरु झाल्याने मुस्लीमबहुल भागांमध्ये ईदची एरवी दिसणारी ह्यरौनकह्ण फिकी पडल्याचे जाणवत होते. हस्तांदोलन, अलिंगन, गुलाबपुष्प देत एकमेकांना ह्यईद मुबारकह्णच्या शुभेच्छा देतानाही अपवादानेच नागरिक दिसून आले. दरम्यान, सकाळी सात वाजता विविध मशिदींतून धर्मगुरूंनी ध्वनिक्षेपकांद्वारे ह्यईदह्ण निमित्त समाजबांधवांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला. तसेच सरकारच्या सर्व सुचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले. जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, विहितगाव, देवळाली कॅम्प, सातपुर आदी मुस्लीमबहुल परिसरात ईदनिमित्त रेलचेल अन‌् उत्साहाचे वातावरण अल्पशा प्रमाणात दिसून आले. शुभेच्छा संदेशासाठी पुन्हा एकदा सोशलमिडियाचा वापर तरुणाईकडून अधिकाधिक केला गेला.

 

 

Web Title: Corona impact : Shahajangi Eidgah remains vacant, people offer prayer at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.