लाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 05:06 PM2019-08-19T17:06:36+5:302019-08-19T17:09:53+5:30

न्यायालयाने अटीशर्थींच्या अधीन राहून जुंभळे यांचा जामीन मंजूर केला. ५० हजार रु पयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्ररदार-साक्षीदारांवर कोणत्याहीप्रकारे दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परवानगी घेणे अशा महत्वाच्या अटी-शर्ती टाकून चुंभळे यांना जामीन मंजूर केला.

Conditional bail given to bribery Shivaji Chumbhale | लाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन

लाचखोर शिवाजी चुंभळे यांना सशर्त जामीन

googlenewsNext
ठळक मुद्दे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.५० हजार रुपयांचा जातमुचलकामहत्वाच्या अटी-शर्ती टाकून चुंभळे यांना जामीन मंजूर केला

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना तीन लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. या गुन्ह्याचा खटल्यावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन सोमवारी (दि.१९) न्यायालयाने चुंभळे यांना सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाने ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यासह आठवड्यातून दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर राहण्याची अटदेखील न्यायालयाने निकाल देताना घातली आहे.
बाजार समितीच्या कार्यालयात समितीच्या विद्यमान संचालकाच्या नात्यातील एका इसमाला ई-नाम योजनेतंर्गत कंत्राटी कामगार म्हणुन नियुक्ती पत्र देण्याच्या मोबदल्यात तक्र ारदाराकडे चुंभळे यांनी १० लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडअंती ६ लाख रूपये घेण्याचे चुंभळे यांनी मान्य केले. त्या रकमेचा पहिला हप्ता चुंभळे यांनी ३ लाख रूपयांच्या स्वरूपात शुक्र वारी (दि.१६) स्विकारला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. चुंभळे यांना शनिवारी (दि.१७) न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी व बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर चुंभळेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तब्येत बिघडल्याची तक्रर केल्याने चुंभळे यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. चुंभळे यांच्या वतीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अटीशर्थींच्या अधीन राहून जुंभळे यांचा जामीन मंजूर केला. ५० हजार रु पयांचा जातमुचलका, आठवड्यातील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणे, तक्र ारदार-साक्षीदारांवर कोणत्याहीप्रकारे दबाव न टाकणे, शहराबाहेर जाण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परवानगी घेणे अशा महत्वाच्या अटी-शर्ती टाकून चुंभळे यांना जामीन मंजूर केला.

Web Title: Conditional bail given to bribery Shivaji Chumbhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.