मुळाणे येथे नवरात्री उत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 11:11 PM2020-10-25T23:11:09+5:302020-10-26T01:05:47+5:30

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे आदिवासी परंपरेनुसार नवरात्री उत्सवात निसर्गाची म्हणजेच घाट्या देवाची पूजा विधी व विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

Concluding Navratri celebrations at Mulane | मुळाणे येथे नवरात्री उत्सवाची सांगता

दिंडोरी तालूक्यातील मुळाणे येथे धा क वाद्य वाजवताना अदिवासि बांधव.

Next
ठळक मुद्देनिसर्गाची पूजा करून उत्सावाची सांगता करण्यात आली.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे आदिवासी परंपरेनुसार नवरात्री उत्सवात निसर्गाची म्हणजेच घाट्या देवाची पूजा विधी व विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

नवरात्री उत्सवात घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी विधिवत पूजा करण्यासाठी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी नागलीचे आणि तांदळाचे पुंजा टाकून घटाची स्थापना केली जाते. त्यामध्ये घडलेले मुंजाबा वाग्देव, नागदेव, विर्देव अशा देवांची पूजा केली जाते. त्याच प्रमाणे घटाची स्थापना झाल्यानंतर नऊ दिवस
धाक वाजून जागरण केले जाते. या गावातील वाडवडिलांच्या परंपरेनुसार चालत आलेले परंपरा आज सुरू आहे. नव्या दिवशी रात्रभर या देवांचे जागरण केले जाते . सकाळी पावणे बोलून कार्यक्रमाची सांगता केली जाते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिंडोरी तालुक्यातील मुळाणे येथे गायकवाड परिवारात मोठ्या कार्यक्रम आनंदात व उत्साहात कार्यक्रम पार पाडला. धा क वादन करण्यासाठी साहेबराव गायकवाड, चिंतामण पालवी, अंबादास गायकवाड, सीताराम जाधव, हिरामण ठाकरे, सतिश गायकवाड, भरत गायकवाड, नामदेव गायकवाड, दिलीप गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते. त्याच प्रमाणे ग्रामस्थ हजर होते. सर्व देवांचे आंघोळ घालून गायन म्हणत कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच दसऱ्याच्या दिवशी आदिवासी समाज रावणाची पूजा करतो. त्याचप्रमाणे निसर्गाची पूजा करून उत्सावाची सांगता करण्यात आली.
 

Web Title: Concluding Navratri celebrations at Mulane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.