पुणेगाव दरसवाडी कालव्यावरचे रेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 12:54 PM2020-06-07T12:54:22+5:302020-06-07T12:55:48+5:30

पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Complete the work of railway crossing on Punegaon Daraswadi canal immediately: Chhagan Bhujbal | पुणेगाव दरसवाडी कालव्यावरचे रेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा : छगन भुजबळ

पुणेगाव दरसवाडी कालव्यावरचे रेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा : छगन भुजबळ

Next

नाशिक देवसाने (मांजरपाडा) वळण योजनेतील पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. 
 देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास विभागाचे कार्यकारी संचालक एन.व्ही.शिंदे यांच्याशी  त्यांनी चर्चा केली होती. त्यानंतर या प्रकल्पाची सर्व अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून या प्रकल्पाबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, देवसाने प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
मांजरपाडा हा नाशिक जिल्ह्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. यातून नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याला पाणी देणे शक्य होणार आहे. नाशिकसह मराठवाड्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील कालेश्वरम प्रकल्पाचा अभ्यास करून मराठवाड्याला पाणी वळविण्याबाबत अहवाल तयार करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  तसेच  पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील १ ते २५ किलोमीटर अंतराचे विस्तारिकरणाचे काम पूर्ण झाले असून पाणी अधिक गतीने पुढे जाणार असल्याने पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी हे येवला तालुक्यात जाऊ शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Complete the work of railway crossing on Punegaon Daraswadi canal immediately: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.