शिवशाही बसेस कराराचा भंग झाल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:42 AM2019-12-14T00:42:49+5:302019-12-14T00:44:26+5:30

राज्य परिवहन महामंडळातील खासगीकरण आणि शिवशाही बसेस चालविण्याच्या अट्टाहासामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप होत असतानाच शिवशाही बसेस या महामंडळाच्या कराराचा भंग करून रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील तक्रारी महामंडळाकडे दाखल झाल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने आता विभाग नियंत्रकांना बसेस तपासणीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Complaint for breach of contract of Shivshahi Buses | शिवशाही बसेस कराराचा भंग झाल्याची तक्रार

शिवशाही बसेस कराराचा भंग झाल्याची तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्नही घटले : प्रवाशांची पाठ तरीही महामंडळाकडून देयके अदा

नाशिक : राज्य परिवहन महामंडळातील खासगीकरण आणि शिवशाही बसेस चालविण्याच्या अट्टाहासामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप होत असतानाच शिवशाही बसेस या महामंडळाच्या कराराचा भंग करून रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील तक्रारी महामंडळाकडे दाखल झाल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने आता विभाग नियंत्रकांना बसेस तपासणीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
राज्यात खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून शिवशाही बसेस सुरू करताना महामंडळाने संबंधित ठेकेदारांशी करार केलेला आहे. परंतु बसेस पुरविणाऱ्या संस्थांनी कराराच्या अनेक अटींचा भंग केला असल्याची तक्रार महामंडळाकडे एका तक्रारकर्त्याने केल्याने हा सारा प्रकार समोर आला आहे. बस मानांकनाचे सर्व निकष गुंडाळून महामंडळाल्या दिलेल्या बसेसमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
करारनाम्यानुसार भारत सरकारच्या मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन असलेल्या संस्थांकडून गाडीची बांधणी करणे, फायर डिटेक्शन संप्रदेश सिस्टम (एफडीएसएस) सुरक्षाप्रणाली नसणे, कामगारांचे हक्क नाकारणे, चालकांची एडीटीटी टेस्ट न घेतेलेल्या चालकाच्या हाती स्टेअरिंग देणे, अशा अनेक नियमांचा भंग करण्यात आल्याची तक्रार महामंडळाकडे गेल्या सोमवारी करण्यात आली होती. राज्यातील अनेक आगारांमध्ये अशाप्रकारच्या नियमबाह्य शिवशाही बसेस असल्याचा दावा तक्रारकर्त्याने तक्रार अर्जात केला आहे.
अनेक गाड्यांना फिटनेस सर्टिफिकेट नसतानाही अशा गाड्या रस्त्यावर धावत असल्याने या गाड्यांचे अपघात होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलेला आहे. याची गंभीर दखल घेत शिवशाही बसेसच्या तपासणीचे आदेश देण्यात आल्यानंतर शिवशाहीमध्ये फायर डिटेक्शन संप्रदेश सिस्टम (एफडीएसएस) नसल्याचे समोर आले
आहे. तक्रारकर्त्याने यंत्र अभियंत्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर शिवशाही बसेसेला फायर डिटेक्शन संप्रदेश सिस्टम नसल्याने त्यांना आता २५ डिसेंबरपर्यंत पूर्ततेचे आदेश देण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये अशाप्रकारच्या दोन बससेस आहे, तर राज्यात अन्य आगारांमध्ये १६ शिवशाही बसेस असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केलेला आहे.
खासगी शिवशाही बसेस महामंडळाच्या ताफ्यात आल्यानंतर या बसेसेविषयी अनेक मतमतांतरे आहेत. शिवशाही बसेसचे अपघात सर्वाधिक असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडूनदेखील केला जात असताना अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्याने शिवशाहीचा मुद्द्या पुन्हा चर्चेत आला आहे.
अपघात झाल्यास जबाबदार कोण?
शिवशाही बसेसला फायर डिटेक्शन सिस्टीम नसल्याचे समोर आल्यानंतर अशा बसेस जागेवरच थांबविणे अपेक्षित असताना या बसेसच्या मालकांना येत्या दि. २५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत जर आग लागण्याची घटना घडली तर यास जबाबदार कोणाला धरणार? असा प्रश्न तक्राकर्त्याने केला आहेत. फायर डिटेक्शन सिस्टीम बसमध्ये नसल्याचे स्पष्ट होऊनही अशा बसेस रस्तयावर धावत असतील तर एसटीचे अधिकारीदेखील शिवशाही कराराचा भंग करीत असल्याचे किंबहूना करार भंग करण्यासाठी ठेकेदाराला प्रोत्साहित करीत असल्याची दुसरी तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.

Web Title: Complaint for breach of contract of Shivshahi Buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.