नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 06:35 PM2021-01-20T18:35:29+5:302021-01-20T18:36:14+5:30

येवला : तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे करण्यात आली आहे.

Compensate the affected farmers! | नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या!

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या!

Next
ठळक मुद्देयेवला : महसूल मंत्र्यांना काँग्रेसच्यावतीने साकडे

येवला : तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे करण्यात आली आहे.
तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे स्थानिक यंत्रणेने पंचनामेही केले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना रपाई देण्याचे जाहिर केले मात्र, अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
सद्यस्थितीत रब्बी हंगाम सुरू असून शेतकरी अर्थिक अडचणीत सापडलेला आहे. किमान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाल्यास थोडासा दिलासा मिळेल. रब्बी हंगामातील पिकांसाठी खर्च करतांना अडचणीच्या काळात मदत होईल, असे स्पष्ट करून शासनाने तातडीने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी प्रांतीक सदस्य एकनाथ गायकवाड, शहराध्यक्ष राजेश भांडारी यांनी केली आहे.
 

Web Title: Compensate the affected farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.