कळवणला पहिल्यांदाच होणार मूर्तींचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:58 PM2020-08-28T22:58:55+5:302020-08-29T00:08:56+5:30

कळवण : गणेशोत्सवात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीला नदीपात्र व धरण परिसरात गर्दी होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जनसाठी नदीवर होणारी गर्दी टाळली जावी, यासाठी नगरपंचायतीने शहरात पाच विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस प्रशासनाकडूनही मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा प्रथमच कळवण शहरात मूर्तिदान उपक्रम राबवला जाणार आहे.

The collection of idols will be the first to be reported | कळवणला पहिल्यांदाच होणार मूर्तींचे संकलन

कळवणला पहिल्यांदाच होणार मूर्तींचे संकलन

googlenewsNext
ठळक मुद्दे गणेशोत्सव : मूर्तिदान करण्याचे नगरपंचायत, पोलीस प्रशासनाने आवाहन

कळवण : गणेशोत्सवात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये बसविण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अनंत चतुर्दशीला नदीपात्र व धरण परिसरात गर्दी होत असते, मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विसर्जनसाठी नदीवर होणारी गर्दी टाळली जावी, यासाठी नगरपंचायतीने शहरात पाच विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस प्रशासनाकडूनही मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा प्रथमच कळवण शहरात मूर्तिदान उपक्रम राबवला जाणार आहे.
पाच महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामुळे मार्च महिन्यापासून सर्वच सण, उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहेत. यंदा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने व गर्दी टाळून साजरा करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक मंडळांनी मिरवणूक न काढता गणेश स्थापना करून प्रशासनाच्या नियमांचे पालन केले आहे. विसर्जन मिरवणुकीवरही बंदी असल्याने मिरवणुका काढता येणार नाही.
विसर्जनावेळी नदी, धरण परिसरात गणेशभक्तांनी गर्दी करू नये यासाठी कळवण नगरपंचायतीने शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संकलन केंद्रांवर मूर्तिदान करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.नगरपंचायतीने स्थापन केलेल्या संकलन केंद्रांवर गणेशभक्तांना आरती करता येणार नसून घरीच अथवा मंडळात आरती व पूजा करून संकलन केंद्रात मूर्तिदान करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्माल्यही नदीत विसर्जित करता येणार नसून, मूर्ती संकलन केंद्रांवर हे जमा करून जलप्रदूषण टाळावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
कळवण शहरात विठ्ठल मंदिर (गांधी चौक), पंपिंग स्टेशन (गिरणा नदी), मार्केट कमिटी (नाकोडा रोड), कळवण मर्चंट बँकेसमोर व संभाजीनगर (गावठाण) या ठिकाणी मूर्ती संकलित केल्या जाणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मूर्तिदान करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- कौतिक पगार, अध्यक्ष, करोना प्रतिबंध कमिटी

सर्व घरगुती गणपती व सार्वजनिक मंडळांनी विसर्जन स्थळीगर्दी टाळण्यासाठी मूर्तिदान संकल्पनेला प्रतिसाद द्यावा. सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून मूर्ती संकलन केंद्रावर मूर्तिदान कराव्यात.
- प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक

कळवण शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. गणेशभक्तांनी घरीच आरती करून संकलन केंद्रावर मूर्तिदान कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहकार्य करावे.
- डॉ. सचिन पटेल, मुख्य अधिकारी, नगरपंचायत

 

Web Title: The collection of idols will be the first to be reported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.